मुंबई : अभिनेत्री ईशा देओल महिन्याभरापूर्वि आई झाली. २० ऑक्टोबरला ईशाच्या घरी एका चिमुकलीचा जन्म झाला आणि सारं घर आनंदून गेलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरोदरपणाच्या काळातही ईशा काही खास फोटो शेअर करत होती. आता महिन्याभराच्या तिच्या मुलीचा एक खास फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


ईशाने तिच्या मुलीचं नावं राध्या ठेवलं आहे. तिच्या पायांचे ठसे आणि सोबत जन्मवेळ आणि तारीख असलेला खास फोटो तिनं इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  



 


'' ती एका महिन्याची झाली आहे. हे किती क्युट आहे'' अशा आशयाचा खास फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.  


दिवाळीच्या दिवसामध्ये राध्याचा जन्म झाला. त्यामुळे हेमामालिनींनी ट्विटरवर गोड बातमी देताना आमच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी नन्ही परी आल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 


अभिनेत्री आणी नृत्यांगणा  ईशा देओल २९ जून २०१२ रोजी लग्नबंधनात अडकली. त्यानंतर २०  ऑक्टोबर २०१७ रोजी ईशा आई झाली आहे.