मुंबई : काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेली बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता लवकरच टीव्ही रियालिटी शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ईशा 'हाय फिव्हर: डान्स का नया तेवर' या शो चे जज करताना दिसेल. त्यातच ईशा आता तिच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. हार्दिक पांड्यासोबत तिच्या अफेअरच्या चर्चा फारच रंगल्या आहेत. पण यावर पहिल्यांदाच ईशा मोकळेपणाने बोलली आहे. पाहा ईशा गुप्ताचा हॉट डान्स


अशी झाली पहिली भेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड वर्तुळात ईशा गुप्ता आणि हार्दिक पांड्याच्या अफेअरची चर्चा आहे.  जूनपासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आला आहे. ईशा आणि हार्दिकची भेट एका पार्टीत झाली होती आणि त्यानंतर त्यांची जवळीक वाढली.


ईशा म्हणते...


एका मुलाखतीत ईशाने हार्दिक पांड्यासोबतच्या अफेअरबद्दल सांगितले की, या गोष्टीत तितकेच सत्य आहे जितके तुम्ही वाचले आहे. लोक बोलणारच, त्यांचे काम आहे ते. काहीही लिहितील पण माझे सत्य मलाच जास्त माहित आहे. या गोष्टीत मी हो पण नाही बोलत आहे आणि नाकारतही नाहीये. 


यावरुन काय स्पष्ट होते?


ईशा गुप्ताच्या या वक्तव्यावरुन असे वाटते की, या दोघांमधील अफेअरच्या चर्चा अफवा नाहीत. ईशाने आपले नाते नीट स्वीकारले जरी नसले तरी नाकारलेही नाहीये. आता यावर हार्दिक पांड्या काय बोलतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


या सिनेमात झळकणार ईशा


ईशा गुप्ता लवकरच टोटल धमाल सिनेमात धमाल करताना दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन इंदर कुमार करत आहे. या सिनेमात अनिल कपूर, अजय देवगण, माधुरी दीक्षित, बोमन ईरानी, महेश मांजरेकर आणि अरशद वारसी आहेत. याशिवाय ईशा जेपी दत्ता यांचा आगामी सिनेमा पलटन मध्ये झळकेल. हा सिनेमा भारत-चीन युद्धावर आधारित आहे.