मुंबई : 'शिव' म्हटलं की आठवतो तो ऋषी सक्सेना.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठीवरील 'काही दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला हा अमराठी मुलगा. शिवची भूमिका साकारणरा ऋषी आज अनेकांच्या आवडीचा अभिनेता आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या.  ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आज ही मालिका संपून काही महिने झाले असले तरी ऋषीने साकारलेली शिवची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. 


ऋषी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सच्या संपर्कात राहातो. त्याच्या सोशल नेटवर्किंग साइटवर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. त्याच्या फिटनेससोबत आता पोस्ट केलेल्या एका फोटोने चाहत्यांचं लक्ष केंद्रित केलं आहे.  या फोटो मागचं खरं कारण काय आणि नेमकं काय शिजतंय हे जाणून घेण्यात चाहत्यांना रस आहे. 



ऋषीचा हा फोटो अभिनेत्री इशा केसकर सोबत आहे. इशाने ''जय मल्हार'' या मालिकेत बानूची भूमिका साकारली होती. इशासोबतचा एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर ऋषीने पोस्ट केला असून त्यासोबत एक कॅप्शन लिहिली आहे. या कॅप्शनमुळे त्या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काही तरी असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याने या फोटोसोबत ''इट्स बीन अ व्हाइल नाऊ'' असे लिहिले होते.



या गोष्टीला बराच काळ झाला असा याचा अर्थ होतो. या फोटोवर ऋषी आणि इशाच्या फॅन्सने भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी तुमची जोडी खूप छान असल्याचे म्हटले आहे तर काहींनी तुम्ही खरंच नात्यात आहात का असा प्रश्न त्या दोघांना विचारला आहे. 


ऋषी सक्सेना आणि इशा केसकर या दोघांनी देखील झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये काम केले होते. त्यामुळे झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमांच्या दरम्यान या दोघांची भेट झाली. ते गेल्या काही महिन्यांपासून नात्यात असल्याचे म्हटले जात आहे. पण या दोघांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला नाहीये. या दोघांमध्ये खरेच काही आहे का याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना लागलेली आहे. त्यामुळे आता यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.