मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल पुन्हा आई होणार आहे. तिने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तिचे हे फोटो इन्टरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत. ईशाने तिच्या गर्ल गॅंग आणि कुटुंबासह  आयुष्यातील हा खास दिवस साजरा केला आहे. या आनंदाच्या क्षणी तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. ईशा आणि भारत यांच्या घरी २३ ऑक्टोबर रोजी चिमुकलीचे अगमन झले होते. आता दोन वर्षांनंतर त्यांच्या घरी एका नवीन पाहुण्याचे अगमन होणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशाने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, 'तब्बल दोन वर्षांनंतर मी हा क्षण पुन्हा अनुभवत आहे. मी माझ्या मित्रमंडळींचे आणि कुटुंबाचे आभार मानते, त्यांनी मला ही खास भेट दिली आहे.'


ईशा आणि भरत २०१० साली विवाह बंधनात अडकले होते. ५ वर्षांनंतर ईशाने राध्याला जन्म दिला होता. अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र तीसऱ्यांदा आजी-आजोबा होणार आहेत. ईशाची छोटी बहिण अहानाने ११ जून २०१५ रोजी डेरिन वोहराला जन्म दिला होता.