Israel-Hamas conflict live: इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेमध्ये युद्धाचा भडका उडालाय. दोन्ही बाजूनं हवाई हल्ले सुरुच आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत 500 हून अधिक लोक ठार झालेत. तर हजारो नागरिक जखमी झालेत. हमास (Hamas) दहशतवाद्यांनी ऑपरेशन 'अल अक्सा फ्लड' असं नाव देत इस्रायलवर (Israel) काल 5000 हून अधिक रॉकेट्सचा गाझा पट्टीतून मारा केला. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत इस्रायलने गाझा पट्टीवर रॉकेट आणि हवाई हल्ले केलेत. आता गाझा पट्टीची सर्व बाजूंनी कोंडी करायला इस्रायलने सुरूवात केलीय. गाझा पट्टीची सर्व दळणवळणाची साधनं रोखण्यात आली आहेत. अत्यावश्यक असा वीज आणि इंधनपुरवठा खंडित करण्यात आला. इस्त्रायल मोठ्या युद्धाची तयारी करत असल्याचं पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी म्हटलंय. दरम्यान, या युद्धाचे जागतिक पडसाद उमटू लागलेत.. इराणनं हमासचं तर अमेरिका, युक्रेननं इस्त्रायलचं समर्थन केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्त्रालयमध्ये अडकली बॉलिवूड अभिनेत्री
इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरु होण्याआधी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नुसरत भरुचा (Nusrat Bharucha) इस्त्रालयमध्ये हाइफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी गेली होती. आपला आगामी चित्रपट 'अकेली'च्या स्क्रिनिंगसाठी नुसरत फिल्म फेस्टिव्हलमध्य सहभागी झाली होती. युद्ध सुरु झाल्यानतंर नुसरतचा कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात होती. इस्त्रायल आणि हमासचं युद्ध सुरू झाल्यानंतर नुसरत इस्रायलमध्ये बेपत्ता झाली होती. तिच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकला नव्हता. त्यानंतर ती एका ठिकाणी बेसमेंटमध्ये सुरक्षित असल्याचं कळलं होतं. तिला लवकरात लवकर भारतात आणण्याचे प्रयत्नही सुरू झाले होते. अखेर या प्रयत्नांना यश आलंय आणि नुसरत मुंबईत परतलीय. बॉलिवूडची अभिनेत्री नुसरत भरुचा सुखरुप मुंबईत पोहोचलीय. 


इस्त्रालयमधून भारतासाठी थेट विमान नसल्याने कनेक्टिंग फ्लाईटने नुसरत आज दुपारी मुंबई विमानतळावर सुखुरप पोहोचली. यावेळी मीडियाने तिला प्रश्न विचारले. पण आता आपली तब्येत ठिक नाही, मला आरामाची गरज असल्याचं सांगत नुसरतने लवकरच आपण मीडियाशी सविस्तर बोलू असं सांगितलं. नुसर भारतात आल्याने तिच्या चाहत्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. 


इस्त्रायलमधल्या भारतीयांसाठी सूचना
भारताने इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात.  भारतीयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. तसंच विनाकारण कुठेही बाहेर पडू नका.. सुरक्षित स्थळं आहेत तिथे थांबा असंही या सूचनांमध्ये म्हटलंय. काही मदत लागल्यास भारत सरकारच्या तसंच दुतावासाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आलाय. तसंच भारतीय दुतावासाने हेल्पलाईन नंबरही जारी केलाय. एअर इंडियाने दिल्ली ते तेल अवीवदरम्यानची सर्व विमान उड्डाणं रद्द केली आहेत.. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हमासच्या हल्ल्याचा निषेध करत आपण इस्रायलसोबत एकजुटीने उभं असल्याचं विधान केलंय. 


9/11 सारखा हल्ला
हमासने इस्रायलवर केलेला हल्ला हा 9/11 सारखा आहे असं इस्रायलने म्हटलंय. दहशतवाद्यांनी क्रूरतेचा कळस गाठत अनेक भागात अनेक मुलांना ओलीस ठेवलंय असा आरोप इस्रायलने केलाय. 300 हून अधिक नागरिक ठार झालेत, तर 1500 हून अधिक जखमी झालेत. दहशतवादी हल्ल्यात महिला, मुलं, लहान बाळांनाही दहशतवादी लक्ष करत असल्याची टीका इस्रायलने केलीय. ओलीस ठेवलेल्यांच्या केसालाही धक्का लागला तर इस्रायल जबरदस्त बदला घेईल असा इशारा इस्रायलने दिलाय. ज्या ज्या भागात दहशतवादी लपलेत त्या त्या भागाला इस्रायल बेचिराख करून टाकेल असा इशारा पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलाय. हमासने कधी विचारही केला नसेल असा बदला इस्रायल घेईल असं नेतन्याहूंनी म्हटलंय.