Israel-Palestine conflict: गाझा पट्टीतील (gaza strip) हमास दहशतवादी गटाने  (Hamas attack on Israel) गेल्या आठवड्यात इस्रायलवर अचानक रॉकेट हल्ला करुन खळबळ उडवून दिली आहे. हमासने इस्रायलवर तब्बल पाच हजार रॉकेट डागल्याचे म्हटलं जात आहे. अशातच इस्रायलनेही पॅलेस्टाईनला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. या संघर्षांमुळे दोन्ही बाजूकडील 1000 पेक्षा जास्त नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अद्यापही दोन्ही बाजूकडून संघर्ष सुरु आहे. अशातच बॉलिवुडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) याचं एक जुने ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ट्वीटवरुन आता त्याच्यावर टीका देखील होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय होती शाहरुख खानची पोस्ट?


इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर अभिनेता शाहरुख खानचं ट्वीट व्हायरल होतंय.ही पोस्ट इस्रायल-पॅलेस्टाईनशी संबंधित आहे. "लहान मुलांना मारून किंवा त्यांना कुणाचातरी मारेकरी बनवून काही फायदा होणार नाही. यामुळे पीडितांची किंवा पीडितांमुळे पीडित बनलेल्यांची परिस्थिती सुधारणार नाही. पॅलेस्टाइनमध्ये शांती प्रस्थापित व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो," अशी पोस्ट शाहरुखने केली होती. इस्रायल हमास संघर्ष पुन्हा पेटल्यानंतर शाहरुखची पोस्ट पुन्हा व्हायरल होत आहे. 



कशासाठी केली होती पोस्ट?


शाहरुख खानची व्हायरल पोस्ट 13 जुलै 2014 ची आहे. 2014 मध्ये हमासने तीन इस्रायली मुलांचे अपहरण केले आणि नंतर त्यांची हत्या केली होती. याविरोधात इस्रायलने 'ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह एज' सुरू केले होते. गाझामध्ये इस्रायलची ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठीण लष्करी कारवाई होती. इस्रायली सैन्याच्या या 50 दिवसांच्या कारवाईत 2,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आणि 7,000 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर शाहरुखने ट्विट केले होते.


दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी गाझामधून इस्रायलवर 3,000 हून अधिक रॉकेट डागल्यानंतर इस्रायल आणि गाझामध्ये आतापर्यंत 1,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इस्रायली संरक्षण दलांनी गाझामध्ये हल्ले सुरू केले. हमासच्या दहशतवाद्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांचे अपहरण करून अनेकांची हत्या केली आहे. या हत्याकांडानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली आहे.