इस्राईलने सुशांत सिंह राजपूतला वाहिली श्रद्धांजली, ट्विट होतंय व्हायरल
इस्राईलने काढली सुशांत सिंह राजपूतची आठवण
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आता या जगात नाही. त्याचं जाणं अनेकांना चटका लावून जाणारं आहे. त्याच्या आत्महत्येच्या बातमीवर फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगातून प्रतिक्रिया येत आहेत. यशाच्या शिखरावर असताना त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोय. फॅन्सला अजूनही यावर विश्वास होत नाहीये की, त्यांचा आवडता अभिनेता हे जग सोडून निघून गेला आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर इस्राईलने देखील ट्विट केलं आहे. इस्राईलने सुशांतला आपला मित्र म्हटलं आहे. इस्राईलच्या परराष्ट्र खात्याचे जनरल आणि डेप्युप्टी डायरेक्टर Gilad Cohen यांनी सुशांतच्या आठवणीत एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, मी सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर संवेदना व्यक्त करतो. तो इस्राईलचा खरा मित्र होतो. तुझी नेहमी आठवण येईल. जेव्हा तो इस्राईलला आला होता. तेव्हा असं काही केलं होतं.'
सुशांत सिंह राजपूतने ड्राइव्ह सिनेमाचं एक गाणं इस्राईलमध्ये शूट केलं होतं. मखना गाण्याचं शूट करण्यासाठी ड्राइवची कास्ट इस्राईलमध्ये होती. त्याच गाण्याची लिंक इस्राईलने ट्विट केली आहे. सध्या सोशल मीडियावर हे ट्विट व्हायरल होतं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड आता २ भागात वाटला गेला आहे. कंगना रनौत सारखे कलाकार सुशांतच्या निधनावर नेपोटिज्मवर बोलत आहेत. त्यांनी बॉलिवूडवर घराणेशाहीचा आरोप केला आहे.