Jackie Shroff Blood Related Disease : बॉलिवूडचे भिडू म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफ हे थॅलेसीमिक्स इंडियाचे ब्रॅंड एम्बॅसिडर आहेत. थॅलेसीमिया हा रक्ताशी संबंधीत एक गंभीर आजार आहे. थॅलेसीमियाचे रुग्ण मग पुरुष असो किंवा महिला त्यांनी प्रेग्नंसीच्या आधी ही टेस्ट करायची असते. जेणे करुण त्यांना प्रेग्नंसीची प्लॅनिंग करायची की नाही हे लक्षात येतं. जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं की आता कोणत्याही व्यक्तीनं लग्नाआधी थॅलैसीमिया माइनरचं टेस्ट करायला हवी. नेमका थॅलेसीमिया हा आजार काय आहे हे जाणून घेऊया 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थॅलेसीमिया एक असा आजार आहे, ज्यात शरीरात हीमोग्लोबिन तयार होणं बंद होतं. हा रक्ताशी संबंधीत एक गंभीर आजार आहे. अनेकदा हा आजार जनुकीय कारणांमुळे होतात. थॅलेसीमिया आई-वडिलांकडून मुलांना देखील होते. याविषयी कमी माहिती असल्यानं हा आजार खूप धोकादायक ठरू शकतो. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जबलपुरच्या पीडियाट्रिशियन डॉक्टर नंदन शर्मा प्रमाणे, मुलांमध्ये थॅलेसीमियाचा आजार हा जनुकिय असतो. जर आई-वडिलांपैकी कोणाला हा आजार असेल तर मुलांना हा गंभीर आजार होण्याची शक्यता 25 % आहे. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या मुलांना असं काही व्हायला नको तर लग्नाआधीच मुलगा आणि मुलीनं ही ब्लड टेस्ट करायला हवी. अशा परिस्थितीत तुम्ही होणाऱ्या बाळाला या गंभीर आजारापासून वाचवू शकतात. 


डॉ. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी 10 हजार पेक्षा जास्त मुलं ही थॅलेसीमिया या गंभीर आजारासोबत जन्माला येतात. या आजारामुळे त्याच्या शरीरात हीमोग्लोबिन आणि रेड ब्लड सेल्स बनण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. हे कारण आहे की थॅलिसीमियानं पीडित असलेल्या लोकांना वेळच्या वेळी रक्त पुरवढा करावा लागतो. तर सतत रक्त चढवल्यानं शरीरात आयरन वाढण्याची शक्यता वाढते. ज्यामुळे लिव्हर, हृदय आणि फुफ्फुस्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. याशिवाय हॅपेटायटिस बी, हॅपेटायटिस सी आणि एचआयव्ही होण्याची शक्यता वाढते. 


लक्षणे


वयानुसार थॅलेसीमियाची वेगवेगळी लक्षण पाहायला मिळतात. काही सामान्य लक्षणं अशी आहेत की मुलांची जीभ आणि नखं हे पिवळी पडू लागतात. मुलाची वाढ खुंटते, वयापेक्षा लहाण आणि अशक्त दिसतात. वजन अचानक कमी होऊ लागतं. श्वास घ्यायला त्रास होतो.


कशी मिळवाल यापासून कायमची सुटका?


डॉक्टरांचं म्हणणं आहे की थॅलेसीमियावर योग्यवेळी योग्य ते उपचार केल्यास त्यापासून सूटका मिळू शकते. रक्त चढवताना वेळोवेळी शरिरातील आयरम काढतं रहावं लागतं. त्याशिवाय फॉलिक अॅसिडसारख्या सप्लीमेंट घेत रहाव्या लागतात. त्याशिवाय बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या पद्धतीनं करता येतं. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)