मुंबई : ‘गोलमाल अगेन’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. तब्बू ब-याच वर्षांनी कॉमेडी करताना दिसणार आहे. या सिनेमाची स्क्रीप्ट न वाचताच तिने हा सिनेमा साईन केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलरमधून तब्बू यावेळीही तिच्या चाहत्यांचे मन जिंकणार हे दिसतंय. या सिनेमामुळे पुन्हा एकदा तिच्या पसर्नल लाईफमधील गोष्टींची चर्चा होऊ लागली आहे. 


तब्बू ही सिनेमात तिची बहिण अभिनेत्री फराहमुळे आली होती. फराह तेव्हा एक मोठं नाव होतं. १९८६ मध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ आणि फराह ‘दिलजला’ या सिनेमात एकत्र आले होते. या सिनेमात डॅनी व्हिलन साकारत होते. सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्यावर डॅनी यांनी त्यांच्या घरी पार्टी ठेवली. फराह तब्बूला सिनेमात आणण्याचा प्रयत्न करीत होती. अशात या पार्टीत ती तब्बूला सोबत घेऊन गेली. 


बॉलिवूड लाईफ डॉट कॉम ने दिलेल्या वॄत्तानुसार, जेव्हा डॅनी यांच्या घरी पार्टी सुरू होती, तेव्हा जॅकी श्रॉफ हे दारूच्या नशेत होते. त्यांनी तब्बूची छेड काढली होती. तब्बूला पाहताच जॅकी श्रॉफ हे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते. याने सर्वांनाच धक्का बसला. अशात अभिनेते डॅनी यांनी जॅकी श्रॉफ यांना रोखल्याने प्रकरण शांत झालं. 

या घटनेनंतर फराहने काही लोकांसोबत बोलताना सांगितले की, जर त्या पार्टीत डॅनी नसते तर जॅकीने तब्बूला बदनाम करून सोडलं असतं. तब्बूने बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलंय. पण तिने कधीही जॅकीसोबत काम केलं नाही. पण तब्बूने या घटनेवर कधीही जाहीरपणे काहीच भाष्य केलं नाही.