Bollywood News: नुकताच पार पडलेल्या 77 व्या कान्स फेस्टीवलमध्ये जॅकलीनने उपस्थित असलेल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवू़डमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. मात्र अभिनयात करीयर करायला आलेल्या जॅकलीनचा  यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. तिच्या स्ट्रगलिंगच्या काळात घडलेला एक किस्सा तिने मुलाखतीत सांगितला आहे. ती म्हणते की इंडस्ट्रीत टिकून रहायचं असेल तर खूप विचित्र पद्धतीने दिलेली वागणूक शांतपणे सहन करावी लागते.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कास्टिंग काऊच किंवा बॉडी शेमिंगचे प्रकार इंडस्ट्रीला काही नवीन नाहीत. अनेक प्रसिद्ध अभिनेत्री या सगळ्याला बळी पडल्या असल्याचं वारंवार समोर आलं. बॉलिवूडमध्ये तुम्ही उत्तम अभिनेते असण्यासोबतच तुमचं दिसणं ही तितकचं महत्त्वाचं असतं. त्यामुळे बऱ्याच कलाकारांनी सुंदर दिसण्याकरीता स्वत:ची प्लॅस्टिक सर्जरी केली. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला देखील तिच्या लुकवरुन टोमणे ऐकावे लागले होते. असं तिने सांगितलं. करीयरच्या सुरुवातीच्या काळात ती शरीराकडे विशेष लक्ष देत असायची. ती दररोज जीमला जात होती. तेव्हा तिला एका अभिनेत्रीने तिला सांगीतलं की, वयाच्या तीस वर्षानंतर बॉलिवू़डमधल्या अभिनेत्रींचं करिअर संपून जातं. त्यामुळे तुम्ही सुंदर दिसणं खूप महत्त्वाचं असतं. 


जॅकलीनला दिला होता सल्ला 
जॅकलीन म्हणते की, सुरुवातीला मला डायलॉग बोलताना खूप मेहनत घ्यावी लागली. त्यासाठी ती हिंदी सिनेमे पाहत होती.चांगलं ऐकून आणि वाचून मला हिंदी बोलता यायला लागलं ती म्हणाली. जॅकलीनला तिच्या नाकावरुन खूप टोमणे ऐकावे लागले. तिला अनेकदा सांगीतलं गेलं की नाकाची सर्जरी केल्यावर तिला सिनेमात चांगले रोल मिळतील. त्यावर जॅकलीनने सांगीतलं की, हा सगळा मुर्खपणा आहे. तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही किती चांगलं काम करता याला महत्त्व द्यायला हवं मला टोमणे मारणाऱ्या सगळ्यांना मी हेच सांगायचे की,मला माझं नाक आहे तसं आवडतं. त्यामुळे मी सर्जरी करणार नाही. तुमचं दिसणं नाही तर  तुमचं काम तुम्हाला ओळख मिळवून देतं,  यावर माझा ठाम विश्वास आहे, असं ती म्हणाली.जॅकलीनने करीयरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर घडलेला किस्सा तिने एका मुलाखतीत सांगीतला होता.