मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आज 30 वा वाढदिवस  जपान मध्ये साजरा करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिने जगभरातील तिच्या चाहत्यांसाठी इंस्ट्राग्रामवर काही खास फोटोज शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये जॅकलीन चक्क 'द जापान टाइम्स'  जपानी न्युजपेपर हातात घेऊन  हसताना दिसत आहे.


 


जॅकलीनचा जन्म बहरीन मधील आहे. ती 2006 साली श्रीलंका युनिवर्स ठरली आहे. तर कोलंबोमध्ये ती मोठी झाली. 2009 साली जॅकलीन भारतात आली. मॉडलिंगच्या उद्देशाने भारतात आलेल्या जॅकलीनला सुजय घोषने 'अल्लादीन' हा चित्रपट ऑफर केला. आणि त्यानंतर चित्रपटांचा सिलसिला सुरूच झाला. सलमान खान सोबत 'किक' मध्येही झळकली होती.  


 



 


जॅकलीन भारतात राहून आता हिंदी भाषा शिकली. यासोबतच तिला इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच आणि अरबी या भाषादेखील येतात.