मुंबई : जॅकलिन फर्नांडिस तिच्या हटके स्टाईलिंगसाठी विशेष चर्चेत असते. तिच्या एका स्माईलवर लोकांचे चाहते फिदा आहेत. पण अभिनेत्रीचे हृदय काही मुलांनी जिंकले आहे आणि ती स्वत:ला त्यावेळी थांबवू शकली नाही. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात ती रस्त्यावरील काही गरीब मुलांशी गप्पा मारताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॅकलिन व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही सर्वात चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांबरोबरच ती म्युझिक व्हिडीओमध्येही सतत सक्रिय असते. तिची सर्व गाणी चांगलीच हिट होतात. या व्यतिरिक्त, जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर देखील चाहत्यांचे मनोरंजन करण्यास मागे हटत नाही. अभिनेत्री सतत तिचे स्टायलिश फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करते. आता जॅकलिन फर्नांडिसचा एक व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे, जो चांगलाच पसंत केला जात आहे.


मुलांना दिलं चॉकलेट
जॅकलिन फर्नांडिसच्या या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, अभिनेत्री रस्त्याने जाताना काही मुले तिच्या गाडीजवळ येतात. लहान मुलगी जॅकलिनच्या चित्रपटाचे खूप कौतुक करते आणि तिचे नावही खूप सुंदर असल्याचं म्हणते. हे सर्व ऐकून जॅकलिन खूप आनंदी होते आणि मुलांना चॉकलेट देते. 


जॅकलिनचे सिनेमे


जॅकलिन फर्नांडिस अलीकडेच 'भूत पोलीस' या कॉमेडी हॉरर चित्रपटात दिसली. त्याच्याशिवाय यामी गौतम, सैफ अली खान आणि अर्जुन कपूर देखील या चित्रपटात दिसले होते. जॅकलिन लवकरच 'किक 2' मध्ये सलमान खान, रोहित शेट्टीच्या 'सर्कस' आणि बच्चन पांडेमध्ये दिसणार आहे.