मुंबई : जितका चर्चेत बॉलिवूड अभिनेता सलमान खान असतो तितकाचा चर्चेत त्याचा बॉडीगार्ड शेरा असतो. नेहमीच सलमानच्या पाठिशी खंबीरपणे उभा असणारा शेरा यावेळी थोडा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. जिथे जिथे सलमान खान तिथे तिथे शेरा हा असतोच. अनेकदा सलमानसाठी त्याने वादही घातला आहे. सलमान खानची सुरक्षा करणं हे शेराचं काम आहे. हे सगळं असलं तरी आता शेराचे असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जे पाहिल्यानंतर अनेक जण शेराला ट्रोल करत आहेत. सलमान खानची सगळ्यात जवळच्या व्यक्तीसोबतचे त्याचे हे फोटो समोर आल्याने सगळीकडे एकच चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या फोटोत शेरा आणि जॅकलिन दिसत आहेत. जॅकलीन फर्नांडिस सध्या 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. गेले अनेक दिवस हा वाद सुरु आहे. काही दिवसांपुर्वी आपलं नाव सुकेश जोडू नका जे काही सुरु आहे ते कायदेशीररित्या सुरु आहे. त्यामुळे मला आणि माझ्या कुटूंबीयांना याचा त्रास होत आहे. असं आवाहन तिने युजर्सना केलं होतं. मात्र सध्या जॅकलिन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सतत कोणत्याना ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी जॅकलिन फर्नांडिस सध्या सलमान कानचा बॉडिगार्ड शेरासोबतच्या फोटोमुळे चर्चेत आले आहेत. खरंतर समोर आलेले हे फोटो व्हायरल होण्यामागचं कारण शेरा आणि जॅकिलनची मैत्री आहे, हे फोटो जुने असले तरी युजर्स हे फोटो पुन्हा पुन्हा सोशल मीडियावर शेअर करतात.


आता पुन्हा एकदा एकदा जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आली आहे. याआधी जॅकलिन सलमान खानसोबतच्या मैत्रीमुळे सतत चर्चेत असायची. कोविड काळात सलमान आणि जॅकलिन सलमान खानचं पनवेलमधील फार्महाऊसवर एकत्र राहत असल्याने चांगली चर्चा निर्माण झाली होती. यामुळे अनेकदा यादोघांच्या अफेअर्सच्याही अफवा उडाल्या होत्या. 


जॅकलिन फर्नांडिसचं वर्कफ्रंट
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच शेवटची सोनू सूदसोबत 'फतेह' चित्रपटात दिसली होती. 'फतेह' हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, जो पंजाबवर आधारित आहे. सोनू सूदच्या होम प्रॉडक्शन शक्ती सागर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती.  लवकरच जॅकलिन 'किक 2', 'वेलकम टू द जंगल', 'हाऊसफुल्ल 5' या सिनेमात झळकणार आहे.