Jagjit Singh Death Anniversary: गायक जगजीत सिंह हे  एक बिनधास्त व्यक्तीमत्व होते. पंजाबमधून आलेल्या जगजीत सिंह हे त्यांच्या गायकीसोबतच खऱ्या आयुष्यातील निर्णयामुळंही चर्चेत होते. त्यांनी सर्व सामाजिक बंधन तोडून प्रथा परंपरा न जुमानता त्यांचं आयुष्य जगलं आहे. अनेकदा त्यांना त्यांच्या निर्णयाचा पश्चात्ताप झाला तर कधी त्यांना आनंददेखील मिळाला आहे. मात्र तरीही त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांचे आयुष्य जगले. त्यांनी गायिका चित्रा सिंह यांच्यासोबत लग्न केले. मात्र, चित्रा सिंह यांचे आधीच लग्न झाले होते. प्रेम ते लग्न इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करताना त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेम गीत या चित्रपटासाठी जगजीत सिंह यांनी गाणं गायलं होतं. त्याचवेळी जगजीत यांचे चित्रावर प्रेम बसले. पण चित्रा यांचे आधीच लग्न झाले होते. त्यांना एक मुलगादेखील होता. चित्रा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, जगजीत सिंह यांच्यासोबत त्यांची पहिली भेट स्टुडिओमध्ये झाली होती. जगजीत यांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांनी सुरुवातीला त्यांच्यासोबत गाणं गायला नकार दिला. त्याचवेळी 1986 साली चित्रा यांच्या वैयक्तीक आयुष्यात वादळ आलं. त्यांनी त्यांचे पती देबो प्रसाद यांच्यासोबत वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. 


एकीकडे, चित्रा यांचे गायन आणि त्यांचे व्यक्तीमत्व यावर जगजीत भाळले होते. त्यांनी चित्रा यांना लग्नाची मागणीदेखील घातली होती. नंतर जगजीत यांनी निर्णय घेतला की, ते प्रेमाची कबुली पतीसमोरच देणार. तेव्हा त्यांनी चित्रा यांच्या पतीला विचारलं की, मी तुमच्या पत्नीसोबत लग्न करु इच्छितो. त्यानंतर दोघांनी 1969 साली लग्न केले. त्यांना विवेक नावाचा एक मुलगादेखील आहे. मात्र, त्यांचे लग्न कुटुंबीयांनी कधीच स्वीकार केले नाही. 


मुलाच्या मृत्यूनंतर कोसळलं संकट


दोघांच्या आयुष्यात जुलै 1990 साली एक वाईट घटना घडली. एका कार अपघात त्यांच्या 21 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. एका अपघातात विवेकचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोघांनी काही वेळासाठी गाणं सोडून दिलं होतं. त्यानंतर त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, माझा गळा आपोआप बंद झाला होता. 


सप्टेंबर 2011मध्ये जगजीत सिंह यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. अनेक दिवसांच्या उपचारांनंतर त्यांचा 10 ऑक्टोबर 2011 साली त्यांचा मृत्यू झाला होता.