मुंबई : गेल्या काही काळापासून समाजात स्त्री- पुरुष समानता प्रचलित होत चालली आहे. असं असलं तरीही काही वर्गांमध्ये मात्र आजही (Girl Child) मुलीला हीन दर्जाची वागणूक दिली जाते. कितीही नाकारलं तरी हेच दाहक वास्तव आहे. सध्याच्या घडीला लोकप्रिय असणाऱ्या एका अभिनेत्रीलाही अशाच काहीशा परिस्थितीचा सामना करावा लागला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कमांडो' Commando फेम अभिनेत्री पूजा चोप्रानंही (pooja chopra) याच परिस्थितीला तोंड दिलं होतं. आगामी चित्रपटाच्या मुलाखतीदरम्यान तिनं त्या वाईट दिवसांवरुन पडदा उचलला. 'जहां चार यार' या चित्रपटाशी आपण भावनिकरित्या जोडलं गेल्याचं सांगत 30 वर्षांपूर्वी आपल्या आईनं मोठ्या धाडसानं वडिलांचं घर सोडलं होतं. (jahaan Chaar Yaar fame bollywood Actress Pooja Chopras father once wanted to kill her)


#ALIAMYFOOT : भारतात भीती वाटते म्हणून पाकिस्तानाच राहायचंय; आईच्या धक्कादायक वक्तव्यामुळे आलियावर जोरदार टीका


 


'वडिलांना मुलगी नको हवी होती, त्यात आईनं दुसऱ्यांदा मुलीलाच (मला) जन्म दिला होता. तेव्हा आईनं खुप ऐकलं... बाबा म्हणायचे एकतर हिला अनाथाश्रमात दे नाहीतर मारून टाक. तेव्हापासून आई घरातून बाहेर पडली, नोकरी करू लागली ती आजपर्यंत नोकरी करतेय', असं सांगत पूजानं आईनंच आपला सांभाळ केल्याचं मुलाखतीत सांगितलं. 



आईनं फार पैशातही आपल्याला चांगल्या सुविधा दिल्या. वाईटातल्या वाईट दिवसांपासून चांगल्यातल्या चांगल्या दिवसांपर्यंत पूजानं मजल मारली आणि परिस्थिती आता कुठे बदलू लागली आहे, हे पाहून तिच्या आईलाही दिलासा मिळत आहे. 


एका अभिनेत्रीच्या प्रसिद्धीकडे पाहून तिच्याविषयी हेवा वाटणं वेगळं पण, तिच्या संघर्षाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.