खंडेराया, म्हाळसा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका जय मल्हार या मालिकेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज. ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. आता ही मालिका तुम्हाला हिंदीत पाहायला मिळणार आहे.
मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका जय मल्हार या मालिकेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज. ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. आता ही मालिका तुम्हाला हिंदीत पाहायला मिळणार आहे.
जेजुरीतील देव खंडोबा यांच्या आयुष्यावर आधारित या पौराणिक मालिकेला सुरु झाल्यापासूनच लोकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. तीन वर्षे सुरु असलेल्या या मालिकेचा टीआरपीपण अव्वलच होता.
काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र आता ही मालिका डब करुन झीच्या हिंदी वाहिनीवर दाखवली जाणार आहे. हिंदीत आवाज देण्यासाठी व्हॉइस आर्टिस्ट्ही निवडण्यात आले आहेत.
महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली होती. जय मल्हारची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, म्हाळसाच्या भूमिकेतील सुरभी हांडे, बानूच्या भूमिकेतील इशा केसकर यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.