रजनीची जादू कायम! `जेलर`ने केला कमाईचा विक्रम; 3 दिवसांमध्ये कमवले `इतके` कोटी
Jailor Box Office Collection: सध्या रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं जवळपास 50 कोटींचा गल्ला भरला आहे. त्यामुळे या चित्रपटाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
Jailor Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर 'जेलर' या चित्रपटानं पुरता धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रजनीकांत यांची जादू ही पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आली आहे. रजनीकांत यांचे चित्रपट हे हीट होताच त्यामुळे त्यांचा कुठलाही नवीन चित्रपट आला की तो हीट होणारच असं समीकरण हे ठरलेलं असतं. सध्या त्यांच्या या चित्रपटानंही ते दाखवून दिलं आहे. हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. रजनीकांत या चित्रपटात प्रमुख भुमिकेतून दिसत आहेत त्यांच्यासोबतच जॅकी श्रॉफ, राम्या क्रिशनन, मोहनलाल, तमन्ना भाटिया अशी तगडी स्टारकास्टही पाहायला मिळते आहे. यावेळी या चित्रपटातील गाणीही प्रचंड हिट झाली आहे. यावेळी रजनीकांत आणि तमन्ना भाटिया यांचे 'कवला' हे गाणंही सुपरहीट झाले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं 43 कोटींपेक्षाही जास्त गल्ला भरला होता. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा पाहायला मिळाली होती. यावेळीही त्यांची चर्चा रंगली आहे. कारण यावेळी रजनीकांत यांच्या चित्रपटानं चक्क कोट्यवधींचा गल्ला राखण्यात दुसऱ्या दिवशीही यश मिळवलं आहे.
11 ऑगस्ट रोजी तीन मोठे चित्रपट हे प्रदर्शित झाले आहेत. यावेळी हॉलिवूडचा 'हार्ट ऑफ स्टोन' नेटफ्लिक्सवर आला आहे, ज्यात आलिया भट्ट आहे. तर अक्षय कुमारचा OMG 2 आणि सनी देओलचा Gadar 2 ही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून या दोन्ही चित्रपटांना समीक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याचसोबत अशावेळी या दोन्ही चित्रपटांना टक्कर द्यायला आदल्या दिवशीच रजनीकांत यांचा 'जेलर'ही आला होता. या तीनही भारतीय चित्रपटांमध्ये 'जेलर' आणि 'गदर 2' चांगली कमाई केली आहे. हे दोन चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करतील. त्यातून आता जाणून घेऊया की Jailor नं तिसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे?
हेही वाचा - Gadar 2 चित्रपटाचं आनंद महिंद्रांचं स्पेशल कनेक्शन! Video पाहून तुम्हाला ओळखा येतंय का पाहा बरं
ट्रेण्ड विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विट केले आहे की, ''या चित्रपटानं अमेरिकेत चांगली कमाई केली आहे. जेलरनं 900K डॉलर कमावले आहेत. आज 1M डॉलर होतील. दुसऱ्या देशांमध्ये पाहिले तर हा चित्रपट मलेशिया, सिंगापूर, दुबईमध्ये नंबर 1 ठरला आहे. तर इंग्लंडमध्ये या चित्रपटानं 500,000 युरो कमावले आहेत. तेही तीन दिवसात.''
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 48.35 कोटी रूपये कमावले आहेत. तर दुसऱ्या दिवशी 25.75 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 35 कोटी कमावले आहेत.