मुंबई : सध्या फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. देशात त्याचप्रमाणे राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनापासून वाचण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांनी 'जनता कर्फ्यू'चं पालन करण्यास सांगितलं होतं. त्यांच्या या आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. बॉलिवूडकरांनी देखील  टाळ्या, घंटानाद करत जनता कर्फ्यूला  प्रतिसाद दिला आहे. हा जनता कर्फ्यू  आज रात्री ९ वाजेपर्यंत असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण परिस्थिती पाहता उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू कायम असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडकरांनी  जनता कर्फ्यूला  प्रतिसाद दिला. त्यांचे टाळ्या, घंटानाद केल्याचे क्षण त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.  








भारतात देखील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नुकताच नवी मुंबईत कोरोनाचा नवा रुग्ण सापडला आहे. तर सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७५ वर गेली आहे.  देशात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. महाराष्ट्रात आणखी ११ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी ७ मुंबईत तर ४ रुग्ण पुण्यातले आहेत. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता  योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रत्येक राज्यांचे मुख्यमंत्री नागरिकांना करत आहेत.