मुंबई : 'धडक' फेम अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या नृत्य कलेचे धडे गिरवत आहे. ती परफेक्ट डान्सर बनण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. ती सध्या बेली डान्स शिकत आहे. बेली डान्स करताना तिचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 'लवयात्री' चित्रपटातील 'अंख लड जावे' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिचे नृत्य कौशल्य चाहत्यांच्या चांगलचं पसंतीस पडत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी चाहत्यांसाठी अनेक वेगळ्या थटणीचे चित्रपट घेवून येणार आहे. 'कारगिल गर्ल' त्याचप्रमाणे भारतीय वैमानीक गुजंन सक्सेना यांच्या बायोपीकमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ती 'दोस्ताना २' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता कार्तिक आर्यनसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे.