मुंबई : अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर दोघींनी फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सारा आणि जान्हवी त्यांच्या चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या मैत्रीबद्दल कायम चर्चेत असतात. एवढंच नाही तर दोघी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. त्यांच्या मैत्रीप्रमाणे दोघींची लव्ह स्टोरी देखील हटके आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी आणि सारा एकाचं घरातील दोन भावांना डेट करत होत्या. जेव्ही जान्हवीची आई श्रीदेवी यांना मुलीच्या रिलेशनशिपबद्दल कळालं, तेव्हा त्यांनी जान्हवीला सर्व काही थांबवण्याची ताकीत दिली. त्यानंतर प्रसिद्ध राजकारणी नेत्याच्या नातवांसोबत असलेलं जान्हवी आणि साराचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. 



जान्हवी कपूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारियाला डेट करत होती. तर दुसरीकडे सारा अली खान त्यांचाच नातू आणि शिखरचा भाऊ  वीर पहारियाला डेट करत होती. 



जर दोघींचं नातं टिकून राहिले असतं तर त्याचं लग्न झालं असतं. पण जान्हवी कपूरने आईचं ऐकलं आणि शिखर पहारियासोबत ब्रेकअप केले. त्यानंतर सारानेही काही काळानंतर वीरपासून वेगळी झाली. अशा परिस्थितीत या दोन्ही अभिनेत्रींचे नाते सुशिल कुमार शिंदे यांच्या नातवांसोबत नातं संपलं.