मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीनं 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. चित्रपटांशिवाय जान्हवी तिच्या लूक्समुळे नेहमीच चर्चेत राहते. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. अलीकडेच करण जोहरने 'कॉफी विथ करण 7' मध्ये खुलासा केला की जान्हवी आणि सारा दोन भावांना एकाच वेळी डेट करत होत्या. करणनं नाव उघड केले नाही परंतु चाहत्यांनी अंदाज लावला की ते वीर पहारिया आणि शिखर पहारियाविषयी बोलत आहे. रिपोर्टनुसार, जान्हवी शिखर पहारियाला डेट केले. नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. आता पहिल्यांदाच ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवीचा हा व्हिडीओ वरिंदर चावलानं या सेलिब्रिटी फोटोग्राफरनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडते. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींकडे पाहते आणि हसते. मग जान्हवी थेट कारजवळ जाऊन आत बसली. शिखर पहारिया आधीच ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. दरम्यान जान्हवीनं पिंक कलरचा सलवार सूट परिधान केला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शिखर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. रिपोर्टनुसार, जान्हवी आणि शिखर दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि नंतर ते विभक्त झाले. 'कॉफी विथ करण 7' वर, करणने डेटिंगच्या अफवांना जवळजवळ पुष्टी दिली, 'मला म्हणायचे होते की ही भूतकाळातील गोष्ट होती. तुम्ही दोघांनी दोन भावांना डेट केले आहे आणि आपल्या तिघांमध्ये साम्य म्हणजे ते दोघे माझ्या बिल्डिंगमध्ये राहत होते.' (janhvi kapoor appearance with ex boyfriend shikhar pahariya both got out in the car watch viral video) 


जान्हवीचा आगामी चित्रपट 'मिली' आहे. यात सनी कौशल आणि मनोज पाहवा यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. बोनी कपूर निर्मित हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय जान्हवीकडे 'बवाल' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' आहेत.