मुंबई : 'धडक' चित्रपटाच्या माध्यमातून  बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. चित्रीकरणाच्या सेटवर कायम ऍक्टिव्ह असणारी जान्हवी तिच्या खासगी आयुष्यात देखील अत्यंत ऍक्टिव्ह असते. जान्हवी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी परदेशात जात असते. जन्हवी फक्त तिच्या प्रोफेशनल लाईफमुळेचं नाही तर खासगी  जीवनामुळे देखील चर्चेत असते. जान्हवीने सोशल मीडियावर काही हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तिच्या याच फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. फोटोंमध्ये ती मस्ती करताना दिसत आहे. पण तिच्यासोबत असलेला  ''मिस्ट्री मॅन'' कोण आहे, हे  कळू शकलेलं नाही. फोटोंमध्ये जान्हवी त्या  ''मिस्ट्री मॅन''सोबत पळताना दिसत आहे. तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंना  एका तासांत अडीच लाख पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. 



सोशल मीडियावर जेव्हा जान्हवी तिचे फोटो शेअर केले तेव्हा तिला एकचं प्रश्न विचारण्यात आला, तो म्हणजे तुझ्यासोबत तो ''मिस्ट्री मॅन'' कोण आहे? पण चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर जान्हवीने अद्याप दिलं नाही. चाहते जान्हवीचे हे फोटो फक्त लाईकचं करत नाही, तर शेअर देखील करत आहेत. 



''मिस्ट्री मॅन''सोबत फोटो शेअर करत जान्हवीने कॅप्शनमध्ये, 'सूर्यास्त होणाऱ्या सूर्याला माहिती असतं की त्यांची सुंदरता कधीतरी संपणार आहे.' असं लिहिलं आहे. जान्हवीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. जान्हवी चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.