रुहि सिनेमाच्या स्क्रिनिंगला जान्हवीने लहान बाळाला असं कडेवर घेतलं...फॅन्स म्हणाले
`रुही`च्या स्क्रिनिंगवेळी जान्हवीनं केलं असिस्टंट अजीम आणि त्याच्या परिवाराला आमंत्रित
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच 'रुहि' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ती राजकुमार राव आणि वरुण शर्मासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशन सध्या जोरदार सुरु आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये जान्हवी कपूर सध्या व्यस्त आहे. नुकतीच जान्हवी सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहचली तेव्हाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. या व्हिडीओमध्ये जान्हवी एका छोट्या बाळाला घेऊन त्याच्यासोबत खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
जान्हवीनं तिचा सिनेमा 'रुही'च्या स्क्रिनिंगळी तिचा असिस्टंट अजीम आणि त्याच्या परिवाराला आमंत्रित केलं होतं. अजीम आपल्या तीन मुलांसोबत 'रुही'च्या स्क्रिनींगला पोहोचला. यावेळी जान्हवी त्यांच्या परिवारासोबत गप्पा मारतानादेखील स्पॉट झाली.
एवढचं न्हवे तर जान्हवीननं अजीमच्या पत्नीकडून तिच्या बाळाला मी घेऊ शकते का? असा प्रश्न विचारला. यानंतर जान्हवीनं बाळाला घेवुन त्याच्या सोबत खेळायला सुरुवात केली. या दोघांचा हाचं व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोयं
या बाळाला उचलून घेतल्यानंतर जान्हवी त्या बाळासोबत खेळण्यास मग्न झाली. बाळासोबत खेळताना जान्हवी खूप खूष दिसत होती. या वेळी जान्हवीनं गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता.या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जान्हवीच्या या व्हिडीओवर चाहते फिदा झाले आहेत.
एका नेटकऱ्यानं या व्हिडीओवर कमेंन्ट केली आहे की, ज्याप्रकारे ती या फॅमिलीसोबत बोलत आहे, त्या बाळासोबत खेळत आहे. यावरुन मी तिला फक्त सॉलिड बोलू शकतो. अशा आशयाचं कॅप्शन एका नेटकऱ्यानं या व्हिडीओवर दिलयं.
तर एका नेटकऱ्यानं श्रीदेवी यांनी आपल्या मुलीवर खुप छान संस्कार केल्याचं कमेंन्टमध्ये म्हटल आहे. आशा अनेक कमेंन्ट या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी करत तिचं भरभरुन कौतुक केलंय. 'रुही' हा सिनेमा 'स्त्री' या सिनेमाचा सिक्वल आहे. या सिनेमात जान्हवी एक आगळी वेगळी भूमिका साकारणार आहे.