वारा आला अन् नको ते घडलं… पाहा जान्हवी कपूर चर्चेत असण्यामागचं कारण
जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबई : बॉलिवूड असो किंवा मग दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, सेलिब्रेटी म्हटलं की ग्लॅमर आणि फॅशन या गोष्टी आल्याच. हे कलाकार नेहमीच मुलाखत, चित्रपट प्रमोशन किंवा इतर कोणत्याही खास कार्यक्रमात इतरांपेक्षा हटके दिसण्यासाठी सर्वांपेक्षा वेगळी फॅशन करण्यावर भर देतात. पण याच स्टाइल, फॅशन किंवा हटके ड्रेसच्या नादात अनेकदा त्यांना लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) 'गुड लक जेरी' (Good Luck Jerry) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी खूप मेहनत घेत आहे. जान्हवी नेहमीच तिच्या ड्रेसिंगमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. जान्हवीचं नाव बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून केलं जातं. यामुळेच जान्हवीला बऱ्याचवेळा उप्स मूमेंटला सामोरं जावं लागतं. आता पुन्हा एकदा जान्हवी उप्स मूमेंटचा शिकार झाली आहे.
जान्हवीचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जान्हवीच्या या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ती बिल्डिंगमधून उतरून कारच्या दिशेने जाताना दिसते. यावेळी जान्हवी चालत असताना वारा येतो आणि तिचा ड्रेस उडू लागतो. जान्हवी लगेच स्वत: चे कपडे सावरते आणि घाईघाईनं निघून जाते.
'धडक' चित्रपटातून जान्हवीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात जान्हवी कपूर ईशान खट्टरसोबत दिसली होती. यानंतर ती 'गुंजन सक्सेना' आणि 'रुही' सारख्या चित्रपटात काम करताना दिसली आहे. लवकरच जान्हवीचा 'गुड लक जेरी' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जान्हवीचे वेगळे रूप पाहायला मिळत आहे.
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचे अनेक चित्रपट अजून यायचे आहेत. जान्हवीचा 'मिली' हा एक सर्व्हायव्हल थ्रिलर आहे. हा चित्रपटाची कथा ही एका नर्सिंग ग्रॅज्युएट मुलीच्या कथेवर आधारीत आहे. जी एका रेस्टॉरंटमध्ये पार्ट टाइम जॉब करते. एक दिवस अचानक ती रेस्टॉरंटच्या फ्रीजर रूममध्ये बंद होते. या फ्रीझर रूममध्ये जगण्यासाठी ती कसा संघर्ष करते? याशिवाय जान्हवी पुन्हा एकदा राजकुमार रावसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये राजकुमार राव, महेंद्र आणि जान्हवी कपूर महिमाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट अशा दोन लोकांची कथा आहे, ज्यांचे एकच स्वप्न असते की क्रिकेटमध्ये महिमा चांगली कामगिरी करेन. याशिवाय 'बवाल' चित्रपटात जान्हवी वरूणसोबत दिसणार आहे.