मुंबई : कलाविश्वात प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला चाहत्यांचं प्रेम येतं, त्यासोबतच त्यांच्या वाट्याला काही असे प्रसंग येतात जे अनेकदा कलाकारांना चर्चेत आणतात. सध्या 'धडक' फेम अभिनेत्री जान्हवी कपूर अशाच एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली जात असून, त्यास कारण ठरतोय तो म्हणजे तिचा नवा  लूक. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच जान्हवी कपूर वांद्रे येथील रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली. यावेळी जान्हवीने पांढरा शॉर्ट फ्रॉक घातला होता. एवढंच नाही तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तिच्या फ्रॉकची बटणे मागून उघडी असल्याचं दिसून येतं आहे.



जान्हवी कपूरकडे आज पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. यावेळी तिला एका नजरेत ओळखणं देखील कठीण झालं. या दरम्यान जान्हवीने केस मोकळे सोडले होते. आणि हाईहिल्स घातल्या होत्या. याच दरम्यान पाऊसदेखील पडत होता त्यामुळे पळत जाताना जान्हवीने गाडी गाठली आणि यावेळचे तिचे फोटो व्हायरल झाले.