मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने फार कमी वेळात चित्रपटसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरच्या हाताला दुखापत झाल्याचं दिसत आहे. मात्र व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरने असं काही केलंय की, की युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कारणामुळे भडकले युजर्स
जान्हवी कपूर शनिवारी मुंबईत स्पॉट झाली. जान्हवीच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिच्या हातात बेल्ट घातलेला दिसतोय. जान्हवी कपूरची ही अवस्था पाहून फोटोग्राफर्सनी तिला विचारलं तुझ्या हाताला काय झालंय? तुला दुखापत झाली आहे का? पण जान्हवी फोटोग्राफर्सच्या या प्रश्नांकडे जान्हवीने पूर्णपणे दुर्लक्ष केलं काहीही उत्तर न देता ती गाडीतून निघून गेली. जान्हवीचं हे वागणं लोकांना आवडलं नाही आणि युजर्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लोकांनी धडाडीने वर्ग घेतले
एका यूजरने लिहिलंय, किती अहंकारी आहे. तर दुसर्‍याने कमेंट करत किती प्रेमाने विचारलं तुला. गेट वेल सून पण तुझा दृष्टिकोन मा योग्य नाही.  तर अजून एकाने विचारलं, एवढं भाव खातेस ? त्याचबरोबर एका यूजरने कमेंट केली की, एवढा एटिड्यूड खातेय की, कोणी मोठी स्टारच झाली आहे. पण जान्हवीच्या हाताला ही दुखापत नेमकी कशी झाली हे अद्याप समजलेलं नाहीये.