Janhvi Kapoor ची हिंमत तर पाहा...फ्लॉप चित्रपट देऊनही मानधनात केली प्रचंड वाढ...
Janhvi Kapoor चा नुकताच `मिली` हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिचा हा चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित झाला असून त्यानं इतकी कमाई केलेली नाही. दरम्यान, त्यात जान्हवीनं तिच्या मानधनात वाढ केल्याचे म्हटले जात आहे.
Janhvi Kapoor Hike Her Fees Before Debut In South Films : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीनं 2018 साली प्रदर्शित झालेल्या 'धडक' (Dhadak) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जान्हवीनं तिच्या चार वर्षाच्या करिअरमध्ये फक्त एक हिट चित्रपट दिला आहे. तो चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. तो चित्रपट म्हणजे 'गुंजन सक्सेना' (Gunjan Saxena: The Kargil Girl). जान्हवीचे आता पर्यंत तीन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. जान्हवीचे गेले दोन चित्रपट 'रुही' (Roohi) आणि 'मिली' (Mili) हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. दरम्यान, असं असताना देखील जान्हवीनं तिच्या मानधनात वाढ केली असे म्हटले जात आहे.
बॉलिवूडमध्ये यश मिळत नसताना आता जान्हवी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे (South Film Industry) वळत असल्याचे दिसत आहे. तर तिच्या वाढत्या मानधनामुळे दाक्षिणात्य निर्मात्यांना धक्का बसला आहे. त्यांचं असे म्हणणे तिला अजून कोणताही तेलगू चित्रपट मिळाला नाही तरी देखील तिनं मानधनात केलेली वाढ पाहून सगळ्यांना आश्चर्य होत आहे. दाक्षिणात्य मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, ज्युनियर एनटीआरसोबत (Jr. NTR) स्क्रिन शेअर करण्यासाठी तिनं चित्रपट निर्मात्यांकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असलेली रश्मिका मंदान्नानं (Rashmika Mandana) पुष्पा या चित्रपटासाठी 5 कोटी रुपये मानधन म्हणून घेतले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूड चित्रपटांसाठी 2-3 कोटी रुपये मानधन घेणारी जान्हवी इथल्या कलाकारांसोबत काम करण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपये मानधन म्हणून घेत आहे. ती निर्मात्यांना असं म्हणाली की इथल्या अभिनेत्रींना सगळ्यात जास्त जेवढे मानधन दिले जाते तितकेच मला पाहिजे.
हेही वाचा : 'चित्रा वाघ माझी सासू...', असं म्हणत Urfi Javed नं उडवली खिल्ली
जान्हवी नाही तर अशा कोणत्या अभिनेत्री आहेत, ज्यांनी 5 कोटी रुपये मानधन म्हणून मागितले?
जान्हवी व्यतिरिक्त 5 कोटी रुपये मानधन मागणाऱ्या अभिनेत्रींमधअये मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आहे. खरंतर गेल्या वर्षी मृणालचा 'सीता रामम' हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. त्यानंतर एकापाठोपाठ एक चित्रपटाच्या ऑफर येत गेल्या. हे पाहता मृणालनं तिचे मानधन वाढवत 5 कोटी केले. हे पाहता निर्मात्यांनी तिला कोणत्याही चित्रपटात साइन केले नाही. त्यामुळे तिनं फक्त एकच चित्रपट केला. हा चित्रपट तिनं शाहिद कपूरसोबत (Shahid Kapoor) केला होता. या चित्रपटाचं नाव 'जर्सी' (Jersey) असून तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.