मुंबई : बॉलिवूडवर वेळोवेळी घराणेशाहीचे आरोप होत असतात. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हा मुद्दा खूप चर्चेत होता. त्याचबरोबर अनेकदा बॉलिवूडचे अनेक स्टार्स याबद्दल बोलत असल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान, आता यावर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचं वक्तव्यही समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाली जान्हवी कपूर?
निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतंच घराणेशाहीवर भाष्य केलं आहे. दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना ती म्हणाले- 'प्रत्येकाला वाटतं की आम्ही यात सक्षम नाही, आम्हाला संधी मिळते ती फक्त घराणेशाहीमुळे. असं ईथे अजिबात होत नाही.


पुढे, तिने आपली बहीण खुशी कपूर आणि चुलत बहीण शनाया कपूर यांचं उदाहरण दिलं आणि सांगितलं की, दोघी खूप आत्मविश्वासू आहेत आणि दोघंही स्वतः आत्मविश्वासू झाल्या आहेत. दुसरीकडे, घराणेशाहीबाबत ती म्हणाली की, हा असा विषय आहे की ज्याची चर्चा कधीच संपू शकत नाही.


लवकरच या चित्रपटात दिसणार आहे
विशेष म्हणजे, जान्हवी कपूरने 2018 साली 'धडक' या चित्रपटाद्वारे तिच्या चित्रपट प्रवासाला सुरुवात केली. यानंतर तिने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये मोठी ओळख निर्माण केली. दुसरीकडे, तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारच्या 'गुड लक जेरी' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.