अभिनेत्री जान्हवी कपूरचा वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा; म्हणाली, `मी सिंगल आहे पण`...
बॉलिवूडच्या यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्रींमध्ये जान्हवी कपूरचे नाव नक्कीच समाविष्ट आहे.
मुंबई : बॉलिवूडच्या यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्रींमध्ये जान्हवी कपूरचे नाव नक्कीच समाविष्ट आहे. सध्या तिचं प्रोफेशनल लाईफ चांगलं चाललंय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गुड लक जेरी' या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. मात्र तिचं वैयक्तिक आयुष्य कसं चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. चला तर मग जान्हवीकडून जाणून घेऊया की तिच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीने प्रेमाच्या स्वरुपात एंट्री घेतली आहे की नाही किंवा ती अजूनही अशाच व्यक्तीच्या शोधात आहे.
जान्हवीचा लेटेस्ट स्टेटस असा आहे की, ती सिंगल आहे . आणि ती खूप खुशही आहे. पण तिला कधीकधी एकटेपणा जाणवतो असंही तिनं म्हटलं आहे. करण जोहरच्या लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण 7' मध्ये उपस्थित असतानाही जान्हवीने सिंगल असल्याचं मान्य केलं. जर कोण तुमच्या जवळ यायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यापासून दूर राहिलेलं बरं, असंही तिने स्पष्ट केलं.
कधी कधी एकटेपणा जाणवतो
नुकत्याच 'कॉफी विथ करण 7'मध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना जान्हवी म्हणाली, "मी सिंगल असल्याने आनंदी आहे. कधीकधी मला एकटेपणा जाणवतो. मी याला कंटाळले आहे. त्याचबरोबर ज्यांना जान्हवीला डेट करायचं आहे त्यांच्यासाठी तिने स्पष्टपणे सांगितले की, ''मी फक्त त्या गोष्टींकडे आकर्षित झाले आहे. ज्यांना खरोखर निश्चित करणं आवश्यक आहे. मी याला कंटाळले आहे. जर तुम्हाला हीलिंग हवे असतील तर दुसरीकडे जा. इथे येऊ नका.''