Janhvi Kapoor On Boney And Sridevi: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. श्रीदेवी यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलींनी देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. जान्हवीने तर फार कमी कालावधीतत कलाविश्वात नाव मोठं करत आहे. अनेक सिनेमांध्ये झळकल्यानंतर जान्हवी (boney Kapoor) वडील बोनी कपूर (boney Kapoor) यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. जान्हवी कपूरचा आगामी सिनेमा मल्याळम सिनेमा 'हेलन' चा हिंदी रिमेक आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवीच्या आगामी सिनेमाचं नाव ‘मिली’ असून, 4 नोव्हेंबर 2022 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या जान्हवी सिनेमाचं प्रमोशन मोठ्या जोमात करताना दिसत आहे. याचदरम्यान जान्हवीने बोनी कपूर यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. (Janhvi Kapoor On Boney And Sridevi)


वडिलांबद्दल काय म्हणाली जान्हवी कपूर? (janhavi Kapoor on boney Kapoor )


एका मुलाखतीत जान्हवी म्हणाली, ‘आम्ही जुहूला राहत होतो आणि बाबा सिनेमांच्या कामात प्रचंड व्यस्त होते. तेव्हा त्यांना धूम्रपानाची खूप सवय लागली. त्यांची सवय सोडवण्यासाठी मी आणि खुशी सिगारेटची पाकीटे नष्ट करायचो. पण तरी देखील त्यांची धूम्रपानाची सवय सुटत नव्हाती.’


‘एवढंच नाही तर आई (श्रीदेवी) ने देखील त्यांची धूम्रपानाची सवय सोडविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण आईला यश मिळालं नाही.’ या कारणामुळे श्रीदेवी आणि बोनी यांच्यात वाद देखीत होत असल्याची माहिती जान्हवीने मुलाखतीत दिली.


पुढे जान्हवी म्हणाली, ‘बाबांनी धूम्रपान सोडावं म्हणून आईने नॉनव्हेज खाणं बंद केल तरी देखील बाबांची सवय सुटत नव्हती. अशामुळे आईचा तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी आईला सकस आहार घेण्यास सांगितलं.’


‘बाबा तिची खूप विनवणी करायचे पण तिने ऐकलंच नाही. अखेर 4 वर्षांपूर्वी बाबांनी सिगारेट सोडली.’ सिगारेट सोडल्यानंतर ते म्हणाले, ती असताना तेव्हा मला जमलं नाही, किमान आता तरी प्रयत्न करून सोडतो.’ (boney kapoor on sridevi)