जान्हवी कपूर बोल्ड ड्रेस घालणं पडलं महागात; पाहा व्हिडिओ
बोल्ड ड्रेस घालणं सोपं असतं पण तो हाताळताना अनेक हिरोईन्सना घाम फुटतो.
मुंबई : बोल्ड ड्रेस घालणं सोपं असतं पण तो हाताळताना अनेक हिरोईन्सना घाम फुटतो. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या अवॉर्ड नाईटमध्ये जान्हवी कपूर अतिशय बोल्ड आणि खुलून दिसणारा ड्रेस घालून आली होती. तेव्हा असंच काहीसं घडलं. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिचा ड्रेस खेचताना तर कधी एडजस्ट करताना दिसत आहे.
अस्वस्थ झाली अभिनेत्री
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात बहुतांश हिरोइन्स आपला बोल्ड आणि हॉट लूक दाखवताना दिसल्या. या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरच्या नावाचाही समावेश आहे. जान्हवी सोशल मीडियावर सतत तिचे बोल्ड ड्रेस घातलेले फोटो शेअर करत असते. मात्र हा रिव्हिलिंग ड्रेस परिधान करून अवॉर्ड नाईटमध्ये पोहोचताच अभिनेत्रीला तो हाताळताना घाम फुटला.
घातला रिवीलिंग गाऊन
या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा हाय थाई स्लिट गाऊन घातलेला दिसत आहे. विशेष बाब म्हणजे या अभिनेत्रीचा हा गाऊन केवळ थाई स्लिटच नाही तर ड्रेसमध्ये कमरेच्या दोन्ही बाजूंना रुंद कटही आहे. इतकंच नाही तर या अभिनेत्रीच्या ड्रेस ईतका डिपनेक आहे की तो या अभिनेत्रीच्या ड्रेसला आणखीनच बोल्ड लूक देत आहे. विशेष म्हणजे जान्हवी कपूरने हा ब्रालेस गाऊन घातला होता. अभिनेत्रीचा हा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.