कॅमेरासमोर Janhvi Kapoor च्या साडीचा सरकला पदर; अभिनेत्री Oops Moment ची शिकार
अभिनेत्री असा ड्रेस घालून कॅमेऱ्यात कैद झाली आहे की ती, कॅमेरासमोर अस्वस्थ होते.
मुंबई : जान्हवी कपूरचं बोल्डनेस एवढं वाढलंय की कोणताही प्रसंग असो किंवा पार्टी, जान्हवी प्रत्येक प्रसंगी आधीपेक्षा जास्त बोल्ड कपडे घालून पोहोचते. अनेकवेळा अभिनेत्री असा ड्रेस घालून कॅमेऱ्यात कैद झाली आहे की ती, कॅमेरासमोर अस्वस्थ होते. जान्हवी कपूरचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री साडीसह असा ब्लाउज परिधान करून पोहोचली होती की, कॅमेऱ्याची लाईट पडताच ती पुन्हा पुन्हा एडजस्ट करताना दिसत होती.
परिधान केला रिवीलिंग ब्लाउज
जान्हवी कपूर अलीकडेच चित्रपट निर्माते अमृत पाल सिंग यांच्या दिवाळी पार्टीत पोहोचली होती. यावेळी, अभिनेत्री ग्रे कलरच्या शिमर साडीसह एक रिवीलींग ब्लाउज परिधान करून आली. अभिनेत्रीच्या ब्लाउजचा गळा खूप खोल होता, जो जान्हवीला घातल्याने अस्वस्थ वाटत होतं.
लाईट पडताच कपडे एडजस्ट करू लागली
हा रिवीलिंग चमकदार ब्लाउज परिधान करून जान्हवी कपूर पापाराझींसमोर कारमधून पार्टीला जाताना दिसली. यादरम्यान पापाराझींनी अभिनेत्रीचे सतत फोटो काढण्यास सुरुवात केली. कॅमेऱ्याचा लाईट अभिनेत्रीच्या अंगावर पडताच तिने साडी एडजस्ट करायल सुरुवात केली. इतकंच नाही तर ती पुन्हा पुन्हा साडीच्या पदरने पुढची बाजू झाकायला लागली. अशा प्रकारे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येतं आहे की, अभिनेत्रीने साडीवर घातलेला ब्लाउज परिधान करताना ती खूप अस्वस्थ आहे.
'मिली' लवकरच रिलीज होणार आहे
जान्हवी कपूरचा 'मिली' हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरशिवाय सनी कौशल मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला असून आता लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बोनी कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.