Janhvi Kapoor ची लगीन घाई... लग्नाची झाली पूर्ण तयारी; असा असेल मुलगा
कशी असेल जान्हवीच्या लग्नाची तयारी?
मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे. 'धडक' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या जान्हवीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. जान्हवीने आतार्यंत 4 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण आता जान्हवीला तिच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची कमतरता भासत आहे. त्यामुळे जान्हवीने तिचा होणारा पती कसा असेल, बॅचलरेट पार्टीनंतर लग्नाबद्दल सगळ्या गोष्टींची तयारी कशाप्रकारे असायला हवी, सांगितलं आहे.
एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने सांगितलं, बॅचलरेट पार्टी कॅप्री येथे झाली पाहिजे. लग्न तिरूपतीमध्ये. शिवाय मेंहदी आणि संगीत मयलापूर याठिकाणी झालं पाहिजे अशी इच्छा जान्हवीने एका मुलाखतीत व्यक्त केली. पुढे जान्हवी म्हणाली, 'रिसेप्शन गरजेचं आहे का?' नसेल तरी काही हरकत नाही?'
लग्नाच्या डेकोरेशनबद्दल जान्हवी म्हणाली, 'लग्नाचं डेकोरेशन पारंपरिक पद्धतीतचं असायला हवं. मोगऱ्याची फुलं आणि मेणबत्तीने सजवलेलं असावं. 2 दिवसांत लग्न पूर्ण व्हायला हवं.' त्यानंतर जान्हवी म्हणाली, 'माझ्या लग्नात खुशी आणि वडील भावूक झाले तर त्यांना अंशूला कपूर सांभाळून घेईल.'
लग्नाच्या कपड्यांबद्दल जान्हवी म्हणाली, 'लग्नात मी कांजीवरम साडी नेसेल आणि ती पूर्ण गोल्ड असेल. मेंहदीसाठी गुलाबी रंगाचा ड्रेस असेल. त्यानंतर संगीतमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल. ' असं जान्हवीने सांगितलं.
कसा असेल जान्हवीचा होणारा पती?
जान्हवी म्हणाली, 'माझा पती समजदार असायला हवा. कारण मी अशा एकाही व्यक्तीला भेटली नाही.' जान्हवीच्या या गोष्टी ऐकून असं वाटतं की तिने लग्नाची पूर्ण तयारी केली आहे. फक्त मुलगा भेटायला थोडा उशिर आहे.