मुंबई:  गायक आणि गीतकार जानी याचा मोहालीजवळ कार अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्याची कार रस्त्यावर पलटी झाली. कारमध्ये त्यांच्यासोबत त्याचा कारचालक आणि व्हिडिओ डायरेक्टर अरविंदर खैरा होते. तिघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांची प्रकृती धोक्याबाहेर असून किरकोळ जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारची एअरबॅग उघडल्याने सिंगरचा जीव वाचला या घटनेत व्हिडिओ डायरेक्टरला अनेक जखमा झाल्या आहेत. या अपघातात जानी किरकोळ जखमी झाला आहे.आज स्वतः जेनीने एक पोस्ट करून तो सुखरूप असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे त्याच्या फॅन्ससाठी नक्कीच ही आनंदाची बातमी असणार आहे.


काय म्हणालाय जानी


"देवाच्या कृपेने कार अपघातात जखमी झालेले आम्ही सर्व आता सुखरूप आहोत आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे ,मी देवाचे खूप आभार मानतो. त्याच्यामुळे मी जीवंत आहे."



गीतकार जानी याने 2012 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांच्या 'शांत सिपाही' या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली. जानीने सरगुन मेहताचे 'किस्मत' हे सुपरहिट गाणे लिहिले आहे. त्याचबरोबर 'तारा' आणि 'जोकर' सारखी गाणीही जानीने लिहिली आहेत जी खूप प्रसिद्ध आहेत.जानी त्याच्या पॉलिवुड कॉमेडी-ड्रामा 'हनीमून'मध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे. गिप्पी ग्रेवाल आणि जास्मिन भसीन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात जानीचीही महत्त्वपूर्ण भूमिका असेल.