भजन सम्राट अनूप जलोटा आणि जसलीन विवाह बंधनात?
`वो मेरी स्टुडंट है`
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून भजन सम्राट अनूप जलोटा (Anup Jalota) आणि जसलीन मथारू (Jasleen Matharu) यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगत आहेत. आता या चर्चांना वेगळं वळण लागलं आहे. भजन सम्राट अनूप जलोटा आणि जसलीन मथारू यांनी लग्न केलं आहे की काय अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. जसलीनने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने सिंदुर आणि बांगड्या घातल्या आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांना जसलीन आणि जलोटा यांचं लग्न झालं आहे की नाही? असा प्रश्न पडला आहे.
परंतु. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तिने या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. 'मी चुपकेसे या गाण्यावर टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी नव वधुप्रमाणे तयारी केली होती.' असं ती म्हणाली. सध्या जसलीनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, बिग बॉस फेम ही जोडी 'वो मेरी स्टुडंट है' या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्याचे मनोरंजन करणार आहेत. या चित्रपटाची कथा अनूप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या नात्या भोवती फिरताना दिसत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याचं वास्तव रूप जगासमोर येणार आहे. या जोडीच्या चर्चा संपूर्ण देशभर पसरल्या होत्या.
अनूप जलोटा आणि जसलीन दोघे तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शोमधून बाहेर आल्यानंतर जसलीनने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिले.