`जस्सी जस्सी कोई नही` फेम अभिनेत्याला अटक
बलात्काराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप
मुंबई : टिलेव्हिजन अभिनेता करण सिंह ओबेरॉयवर एका महिलेला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महिलेने याप्रकरणी ओशिवारा पोलीस स्थानकांत एफआयआर दाखल करण्यात आली होती. महिलेने केलेल्या तक्रारीत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे तसेच त्याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडिओ दाखवून महिलेकडून पैशांची मागणी करत असल्याचा आरोपही लावण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अभिनेता करण सिंह ओबेरॉयविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
महिलेने केलेल्या एफआयआरनुसार, २०१६ मध्ये एका डेटिंग अॅपद्वारे दोघांची ओळख झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि भेट होऊ लागली. एक दिवस करण सिंह ओबेरॉयने महिलेला त्याच्या रुमवर भेटण्यास बोलवले आणि तिथेच लग्नाचे वचन दिले. यादरम्यान करणने तिच्यावर बलात्कार करुन त्याचा व्हिडिओ काढला. या व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत, धमकावून पैशांची मागणी करत असल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
करण सिंह ओबेरॉय 'जस्सी जस्सी कोई नही' या टेलिव्हिजनवरील शोमधून घरां-घरांत पोहचला होता. अभिनयासह करण गायक असून त्याचा २००० साली गाण्याचा ग्रुपही होता. करणच्या या ग्रुपला त्याने 'बॅन्ड ऑफ बॉइज' असं नाव दिलं होतं. सुधांशु पांडे, शेरिन वारघसे, सिद्धार्थ हल्दीपुर आणि चैतन्य भोसले यांच्यासह अनेर गाणी गायली आहेत. त्यानंतर काही वर्षांत हे सर्व वेगळे झाले. करण अभिनेत्री मोना सिंहला डेट करत होता. या दोघांचा साखरपुडाही झाला होता. परंतु नंतर या दोघांचं नातं तुटलं होतं.