Javed Akhtar on Ranbir Kapoor Getting Same Stardom as Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. हा चित्रपट गेल्या वर्षी 2023 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असली तरी देखील काहींनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. या चित्रपटातील कलाकारांना त्यांच्या अभिनयासाठी प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तर जावेद अख्तर यांनी या चित्रपटावर टीका केली होती. अशात पुन्हा एकदा जावेद अख्तर यांनी असं एक वक्तव्य केलं ज्यानं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकप्रिय लेखक आणि गीतकाल जावेद अख्तर यांनी नुकतीच 'द इंडियन एक्सप्रेस' ला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी अ‍ॅन्ग्री यंग मॅनचा आदर्श स्वरूम म्हणून त्यावर त्यांचे विचार मांडले. त्यांनी म्हटलं की आज अ‍ॅन्ग्री यंग मॅनची भूमिका मोठ्या पडद्यावरून गायब झाली आहे. जावेद अख्तर यांनी अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचं उदाहरण घेत सांगितलं की 'त्यांच्या भूमिकेत असलेलं दु:ख हे दिसून यायचं, आता ते सगळं काही विसरले आहेत आणि आता फक्त राग दाखवतात. जे खूप वाईट आहे. अशा प्रकारे अ‍ॅन्ग्री यंग मॅन चित्रपटांमधून लांब गेले.'


त्यानंतर पुढे जावेद अख्तर यांनी विचारण्यात आलं की 'अ‍ॅनिमल' मधील रणबीर कपूरची भूमिका अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे त्याला मोठा स्टार बनवू शकणार नाही? त्यावर उत्तर देत जावेद अख्तर यांनी सांगितलं की 'नाही, नाही, मी त्यांच्यासाठी एक चित्रपट लिहू शकतो' आणि त्यानंतर ते हळूच हसले. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी रणबीरसोबत काम करण्यासाठी दरवाजे उघडे केल्याचा अंदाज त्यांचे चाहते बांधत आहेत. दरम्यान, जावेद अख्तर यांना रणबीरची या चित्रपटातील भूमिका आवडली नव्हती. त्यावर त्यांनी अनेकदा आक्षेप घेतला होता. 


हेही वाचा : दुसऱ्या धर्मातील अन् 8 वर्ष लहान अभिनेत्याशी लग्न; 40 व्या वर्षी झाली आई...; अनेक वर्षानंतर अचानक 'ही' अभिनेत्री चर्चेत!


दरम्यान, 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात रणबीर कपूर, राधिका मंदाना, तृप्ती डिमरी, बॉबी देओल, अनिल कपूर आणि इतर अनेक कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन हे संदीप रेड्डी वांगा यांनी केलं आहे. चित्रपटात रणबीर कपूरनं रणविजय सिंग ही भूमिका साकारली आहे.