Defamation Case : अभिनेत्री कंगना रानौतच्या अडचणीत वाढ
सडेतोड बोलणं कंगनाला भोवणार
मुंबई : आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranauat) हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईत कंगना विरोधात बदनामीची केस सुरू आहे. कंगनावर ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी ही केस नोंदवली आहे.
मुंबईतील सत्र न्यायालयात झाली सुनावणी
या प्रकरणात सोमवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली आहे. न्यायालयाने संक्षिप्त सुनावणीनंतर हे प्रकरण संपवण्याकरता कंगना रानौतने केलेला अर्ज फेटाळला आहे. कंगना रानौतने या अर्जात जावेद अख्तर यांच्या तक्रारीविरोधात मजिस्ट्रेट कोर्टात सुरू केलेली कारवाई थांबवण्याची मागणी केली होती. यावर कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी सत्र न्यायालयात आग्रह केला आहे की, या प्रकरणात अंधेरी मजिस्ट्रेट कोर्टाने जाहीर केलेले समन आणि कायदेशीर कारवाईला रद्द केलं जावं.
जावेद अख्तर यांनी फिर्याद दिली होती
जावेद अख्तर यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दंडाधिकाऱ्यांकडे मानहानीची तक्रार दाखल केली होती. टेलिव्हिजन मुलाखतीत अभिनेत्रीने त्यांच्या विरोधात अपमानास्पद विधाने केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर अभिनेत्रीविरोधात कोर्टात ही सुनावणी सुरू आहे.