Javed Akhtar Says Marriage is Useless : लोकप्रिय लेखक जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आजमी यांची जोडी ही आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ते आनंदी आयुष्य जगत असले तरी देखील ते नेहमीच लग्नाविषयी काहीतरी बोलताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शबाना यांनी सांगितलं की त्या विवाह संस्थेला जास्त महत्त्व देत नाही. एका मुलाखतीत जावेद यांनी सांगितलं की एकमेकांसाठी असलेला आदर हे कोणत्याही नात्यात असलेली महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं की लग्न ही एक प्राचीन परंपरा आहे, ज्यात गेल्या अनेक वर्षांपासून घाण जमा झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जावेद अख्तर यांनी सांगितलं की ते आणि शबाना एक पारंपरिक विवाहीत जोडप्याच्या तुलनेत खूप चांगले मित्र आहेत. याविषयी त्यांनी बरखा दत्तच्या मोजो स्टोरीवर बोलताना सांगितलं की 'खरंतर आम्ही कसं तरी लग्न केलंय. आम्ही मित्र आहोत. चांगल्या वैवाहिक आयुष्यासाठी माझी फक्त एकच योग्यता आहे की तुम्ही मित्र आहात की नाही? लग्न वगैरे फार वायफळ गोष्टी आहेत. ही खूप जुनी परंपरा आहे, सांगायचं झालं तर हा एक असा दगड आहे जो डोंगरावरून खाली येताना धूळ आणि कचरा घेऊन येतो आणि लग्नाचं तसंच आहे.'


जावेद अख्तर यांनी पुढे सांगितलं की एका नात्यात दोघांनी ही समजून घ्यायला हवं की प्रत्येक व्यक्तीचा काही आवडी असतात काही स्वप्न असतात. त्या सगळ्यासोबत पुढे जाण्याचा अधिकार आहे. त्यांनी पुढे म्हटलं की 'आम्हाला हे समजायला हवं की दुसरी व्यक्तीसुद्धा माणूस आहे, ज्याच्या काही आवडी आणि स्वप्न असती. त्यांचा त्यांच्या आवडींवर तितकाच अधिकार आहे जितका माझा माझ्या आवडींवर आहे. फक्त इतकंच नाही तर हे काही रॉकेट सायन्स नाही. खरंतर हे खूप सोपं आहे. तुम्ही फक्त एकत्र आनंदी राहू शकतात जर तुम्ही दोघं आनंदी आहात तर.'


हेही वाचा : तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लवकरच घेणार सप्तपदी; दोघं आलीशान घराच्या शोधात


पुढे जावेद यांनी सांगितलं की 'एक गोष्ट महत्त्वाची आहे, जर आदर नसेल तर तो धोका आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जी महिला स्वतंत्र असते ती तिच्या व्यवसाय, तिचं मत, सगळं काही घेऊन येते. एक गोष्ट स्पष्ट आहे की एक व्यक्ती जी तुमच्यासोबत राहते ती तुमची गुलाम नाही. ते गैरसोयीचं असेल पण ते गुलाम नाहीत हे समजून घ्यायला हवं.'