अमिताभच्या नातवावर फिदा झाले जावेद अख्तर, श्वेता बच्चनला म्हणाले, `तुझा मुलगा स्टार बनेल`
Javed Akhtar Praises Agastya Nanda : `द आर्चीज` चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पण अनुभवी गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा याचे कौतुक केले आहे. जावेद अख्तर यांनी अगस्त्य नंदा याचे वर्णन `निरागस हिरो` असा केला आहे.
Javed Akhtar Betting Big on Agastya Nanda: लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी सांगितले की, ते आपली मुलगी झोया अख्तरला ओरडल्याशिवाय तिचे कौतुक करू शकत नाही. परंतु हे सांगतानाच अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांची प्रशंसा करायला विसरले नाही. जावेद अख्तर म्हणाले की, ऋषी कपूर यांच्यानंतर प्रेक्षकांनी अगस्त्य नंदासारखा कोणी पाहिला नसेल. ऋषी कपूर यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान नवीन प्रतिभा असे त्यांनी अगस्त्य नंदाचे वर्णन केले आहे.
जावेद अख्तर यांनी रेडिफला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य हा आज आपण पाहत असलेल्या 'मर्दानी, टॉक्सिक' नायकांच्या तुलनेत अधिक 'निरागस' असल्याच तो म्हणाला. या तरुण अभिनेत्याने झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
7 ते 70 वर्षांपर्यंत सगळ्यांसाठी 'द आर्चिज' सिनेमा
जावेद अख्तर म्हणाले की, 'द आर्चीज' 7 ते 70 वर्षांपर्यंतच्या सर्व वयोगटातील लोकांचे मनोरंजन करतो. चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान घडलेल्या एका घटनेची आठवण करून देताना जावेद अख्तर म्हणाले, "प्रीमियरमध्ये एक महिला होती जी 70 वर्षांपेक्षा जास्त वयाची होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली की, यामुळे तिला तिच्या तरुण दिवसांची आठवण झाली, जेव्हा तिला आर्चीज कॉमिक्सचे व्यसन होते.
शाहरुख खान आणि श्रीदेवीच्या लेकीचाही डेब्यू
जावेद अख्तर यांनी कबूल केले की बॉलीवूड आयकॉन्सच्या मुलांना पाहण्यात चित्रपट पाहणाऱ्यांना रस असेल. अगस्त्यसोबतच शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांनीही 'द आर्चिज'मधून पदार्पण केले आहे. यापैकी कोणालाही चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. असे असूनही जावेद अख्तर यांचे मत बदललेले नाही.
जावेद अख्तर यांनी अगस्त्यच्या आईचे कौतुक
ते म्हणाले, “मी अगस्त्याच्या आईला म्हणजेच श्वेता बच्चन नंदाला म्हणालो- तुझा मुलगा स्टार होणार आहे. आतापर्यंत हिरोची संकल्पना टॉक्सिक, माचो मॅन अशीच होती. येथे एक निर्भय आणि निष्पाप नायक आहे. बॉबीमध्ये ऋषी कपूरनंतर अगस्त्यासारखा नायक प्रेक्षकांनी पाहिला नाही. अगस्त्य सर्व तरुणांना, विशेषतः मुलींना आवडेल.