`जवान`ने बॉक्स ऑफिसवर पार केला 600 करोडचा आकडा पार; लवकरच येणार `जवान2`
जवानच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या तिकिटांवर बाय वन गेट वन ऑफरची घोषणा केली होती ज्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली. जवानच्या यशामुळे दिग्दर्शक ऍटली खूप खूश असून सिक्वेलबाबत बरीच अटकळ बांधली जात आहे.
मुंबई : शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान' गेल्या महिन्यात रिलीज झाल्यापासून रेकॉर्ड मोडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 25 दिवसांपेक्षा जास्त वेळ घालवला आहे आणि या काळात त्याने जबरदस्त कमाई केली आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही 'जवान' ( नवे विक्रम प्रस्थापित करत आहे.
SACNILC च्या अहवालानुसार, रविवारी चित्रपटाने 8.80 कोटी रुपयांची कमाई केली आणि 'जवान'चं एकूण कलेक्शन 604.25 कोटी रुपये इतकं झालं. हे कलेक्शन चित्रपटाच्या हिंदी, तमिळ आणि तेलुगु व्हर्जनच्या एकूण कमाईचं आहे. तर, जवानने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 24 दिवसांत अंदाजे 1068.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
अलीकडेच, जवानच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या तिकिटांवर बाय वन गेट वन ऑफरची घोषणा केली होती ज्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली. जवानच्या यशामुळे दिग्दर्शक ऍटली खूप खूश असून सिक्वेलबाबत बरीच अटकळ बांधली जात आहे. याबाबत उत्तर देताना, चित्रपट निर्मात्याने ETimes ला सांगितलं होतं की, 'मी अजूनही जवान याशातून बाहेर आलेलो नाही. त्यामुळे माझ्या प्रत्येक चित्रपटाचा ओपन एंडिंग असतो. राजा रानीपासून बिगिल आणि जवानपर्यंत प्रत्येक चित्रपटाचा स्वतःचा ओपन एंडिंग असतो. मी कधीच असा विचार केला नव्हता की, मला सिनेमाचे दोन भाग करावे लागतील पण हो, आता प्रत्येकजण जवानच्या सिक्वेलबद्दल विचारत आहेत.
तो पुढे म्हणाला, 'मी जिथे जातो तिथे प्रत्येकजण विचारत असतो की, 'जवान 2' कधी रिलीज होणार आहे? त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. आधी मला जवानमधून बाहेर येऊ द्या आणि मग मी पुढे काय करणार आहे याचा विचार करू द्या. शाहरुख व्यतिरिक्त 'जवान' मध्ये नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा यांच्याही भूमिका आहेत. या अॅक्शन एंटरटेनरमध्ये दीपिका पदुकोण आणि संजय दत्त विशेष भूमिका साकारताना दिसत आहेत.
यानंतर शाहरुख खान राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि प्रभास स्टारर 'सलार' या चित्रपटाची टक्कर होणार आहे. डंकी हा एक इमिग्रेशन ड्रामा आहे आणि त्यात शाहरुख मुख्य भूमिकेत आहे, ज्यामध्ये तापसी पन्नू आणि विकी कौशल महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.