मुंबई : प्रसिद्ध टीव्ही होस्ट, बॉलीवूड अभिनेता आणि बिग बॉस स्पर्धक जय भानुशालीची पत्नी माही विज हिला रस्त्यावर बलात्काराची उघड धमकी मिळाली आहे. जयची पत्नी स्वतः अभिनेत्री आहे. पण लग्नानंतर तिने अभिनय करिअर थांबवलं आणि मुलांचं संगोपन सुरू केलं. मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहीने शेअर केला व्हिडिओ
अभिनेत्री माही विजने नुकताच तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने सांगितलं की, एका व्यक्तीने तिला मध्येच थांबवलं आणि तिला शिवीगाळच केली नाही तर बलात्काराचीही धमकी दिली. तिने या व्हिडिओमध्ये मुंबई पोलिसांनाही टॅग केलं असून स्वत:साठी मदतीचा हात मागितला आहे. माही विजचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



मुंबई पोलिसांकडे मागितली मदत 
माही विजने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये फक्त एका गाडीची नंबर प्लेट दिसत असून काही लोकांचा आवाज येत आहे. हा व्हिडिओ फक्त चार सेकंदांचा आहे. अभिनेत्रीने मुंबई पोलिसांना टॅग करत म्हटलं आहे की, आम्हाला धमकी देणाऱ्या या व्यक्तीला शोधण्यात मला मदत करा. माहीच्या या ट्विटला मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं आहे. तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देत ​​तक्रार नोंदवा, असं त्यांनी लिहिलं आहे.