Jaya Bachchan यांनी ऐश्वर्याच्या आईचा हात रागाने झटकला? काय आहे Viral Video मागील सत्य
Jaya Bachchan Video : जया बच्चन आणि सूनबाई ऐश्वर्या राय बच्चनच्या आईचं एकमेकांशी जमत नसल्याचं समोर आलं आहे. एका व्हायरल व्हिडीओमध्ये राय बच्चनची आई वृंदा राय यांचा हात झटकताना दिसून आल्या आहेत.
Jaya Bachchan Viral Video : बॉलिवूडमधील दिग्गज आणि राजकारणी जया बच्चन यांच्या रागाचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जया बच्चन पापाराझींसोबतच्या उद्धट वागणुकीमुळे त्या कायम ट्रोल होत असतात. पण त्यांच्या या रागाची शिकार बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन यांची आई आणि विहीणबाई ठरल्या आहेत. जया बच्चन आणि वृंदा राय यांच्यामध्ये आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.
वृंदा राय यांचा हात रागाने झटका?
जया बच्चन यांच्या रागाचं दर्शन घडविणारा हा पहिला व्हिडीओ नाही. यापूर्वीही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. जया बच्चन यांच्या रागाचा सामना कायम पापाराझींना करावा लागला आहे. नुकताचं राणी मुखर्जी यांचा सासूचं निधन झालं. त्यावेळी जया बच्चन मुलगी श्वेता बच्चन नंदा राणी मुखर्जीकडे गेली तेव्हा जया बच्चन पापाराझींवर चिडली होती.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जया बच्चन या ऐश्वर्या राय बच्चनची आई वृंदा राय यांचा हात रागाने झटकताना दिसतंय. हा व्हिडीओ कोचादियां या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळीचा आहे. जया बच्चन यांच्या या कृत्यामुळे त्या परत एकदा ट्रोल झाल्या आहेत. (jaya bachchan angrily push away aishwarya rais mothers hand Trending video truth about viral video)
काय आहे Viral Video मागील सत्य
हा व्हिडीओ जुना असून पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेडिट (Reddit) यूजर्सने असा दावा केला आहे की, जया बच्चन यांना बदनाम करण्यासाठी हा व्हिडीओ एडिट करुन वापरण्यात आला आहे. एका यूजरने लिहिलं की, मी पूर्ण व्हिडीओ पाहिला आणि तो चुकीच्या पद्धतीने एडिट करण्यात आला आहे. एका वापरकर्त्यांने म्हटलं आहे की, कृपया संपूर्ण व्हिडीओ पहा यात जया ऐश्वर्या राय आणि अमिताभ यांच्यामध्ये उभी राहिली नाही. वृंदा राय यांनी जया यांना ऐश्वर्याचा बाजूला उभं राहिला सांगितलं तेव्हा जयाने आदराने त्यांचा हात धरला. त्यानंतर ऐश्वर्या राय हिच्या आईने स्वत:चा हात काढला.
When visibly upset Jaya pushed away Aishwarya's mother's hand away at Rajnikanth trailer of his movie 'Kochadaiiyaan'.
by u/Scaryharry16 in BollyBlindsNGossip
सोशल मीडियावर सध्या या व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. जया बच्चन त्यांचा रागामुळे काय ट्रोल होत असतात.