Amitabh रोमॅंटिक नाहीत, गर्लफ्रेंड असती तर..., Jaya Bachchan यांनी पतीविषयी केला होता मोठा खुलासा
Jaya Bachchan Birthday Special : जया बच्चन यांनी एका मुलाखतीत पती अमिताभ बच्चन त्यांच्यासोबत रोमॅंटिक नाही असा खुलासा केला होता. त्यावेळी अमिताभ यांनी देखील ते रोमँटिक नाही असं म्हटलं होतं. दरम्यान, आज जया बच्चन या त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Jaya Bachchan Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या नेहमीच त्यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत राहतात. पण एक काळ असा होता जेव्हा जया बच्चन या त्यांच्या खासगी आयुष्यासोबतच त्यांच्या करिअरमुळेही चर्चेत रहायच्या. लग्नाच्या काही वर्षांनंतर तर अमिताभ (Amitabh Bachchan) यांचे नाव अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्यासोबत जोडण्यात आले होते. यामुळे अमिताभ आणि जया यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद होऊ लागले होते. पण जया बच्चन यांनी संपूर्ण परिस्थिती नीट हाताळली आणि त्यांचा सुखी संसार पुन्हा एकदा सुरु झाला. पण तुम्हाला माहितीये का? एका मुलाखतीत लग्नानंतर जया बच्चन यांनी अमिताभ यांच्याविषयी एक खुलासा केला होता की ते रोमॅंटिक नाही. आज जया यांचा 75 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं याविषयी जाणून घेऊया...
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी दोघांनी सिमी गरेवालच्या Rendezvous with Simi Garewal चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अमिताभ रोमॅंटिक नाही असा खुलासा जया बच्चन यांनी केला होता. यावेळी जया यांना त्यांच्या खासगी आयुष्याविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी पती म्हणून अमिताभ यांना किती रेटिंग द्याल, अमिताभ हे रोमॅंटिक आहेत का? सिमी गरेवालच्या अमिताभ रोमॅंटिक आहेत या प्रश्नावर अमिताभ यांनी स्वत: नकार दिला. तर जया बच्चन म्हणाल्या, 'माझ्यासोबत नाही'. (Amitabh Is Not Romantic With her)
त्यावर अमिताभ यांनी लगेच सिमी गरेवालला प्रश्न विचारला की रोमॅंटिकचा अर्थ काय आहे आणि त्यांना नक्की काय विचारायचं आहे? त्यावर सिमी यांनी त्यांना काय वाटतं ते सांगितलं. त्यावर उत्तर देत जया म्हणाल्या, रोमॅंटिकचा अर्थ वाइन घेऊन येणं, फूल आणणं हे सगळं. पण जया पुढे लगेच म्हणाल्या अमिताभ हे लाजाळू आहेत. दरम्यान, जया पुढे म्हणाल्या, 'अमिताभ हे रोमॅंटिक आहेत. पण त्यांच्यासोबत नाही. जर त्यांची गर्लफ्रेंड असती तर शक्यता आहे की त्यांनी फूलं आणि वाइन आणली असती. पण हे त्यांच्यासोबत होईल असं त्यांना नाही वाटतं.'
रोमान्स करणं म्हणजे वेळ वाया घालवणं
जया आणि अमिताभ रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा त्या दोघांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नव्हता. तर अमिताभ म्हणायचे की रोमान्स करणं म्हणजे वेळ वाया घालवणं, असं अमिताभ त्याच मुलाखतीत म्हणाले.
हेही वाचा : विभक्त झाल्यानंतरही Samantha नं नागा चैतन्यच्या भावाला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, म्हणाली...
दरम्यान, दुसऱ्या एका मुलाखतीत जया बच्चन यांनी सांगितलं होतं की त्यांची आणि अमिताभ यांची पहिली भेट झाली होती तेव्हा त्या घाबरल्या होत्या. तर अमिताभ हे एकमेव होते ज्यांनी त्यांना काहीही काम सांगितलं किंवा काही बोलले तरी त्या ऐकूण घ्यायच्या. त्यांच्यासाठी हे 'लव अॅट फर्स्ट साइट' होतं. त्यांना काही झालं तरी अमिताभ यांच्यासोबत रहायचे होते. त्यामुळे अमिताभ काही सांगायचे तरी त्या ऐकूण घ्यायच्या.