Jaya Bachchan Gets Angry: नुकताच बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 80 वा वाढदिवस मोठ्या थाट्यात साजरा करण्यात आला. 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati ) या शोदरम्यान मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी बिग बी यांना सप्रराईज दिलं. त्यावेळी अमिताभ बच्चन भावूक झाले होते. पण जया बच्चनला एवढा राग का येतो? असं प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातो आहे. जया बच्चनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) खूप ट्रोल  (Troll) होतो आहे. 


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ मुंबईतील (Mumbai) लॅक्मे फॅशन वीकचा (lakme fashion week) आहे. रविवारी जया बच्चन आपल्या नात नव्या नवेली नंदासोबत (Navya Naveli Nanda) पोहोचल्या. त्यावेळी त्या खूप वैतागलेल्या दिसल्या. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जेव्हा पापाराझीने तिचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या चिडल्या.जया बच्चन पापाराझींना रागाने विचारू लागली, “तुम्ही कोण आहात? तुम्ही मीडियाचे आहात का? तुम्ही कोणत्या माध्यमातील आहात? हे ऐकून तिथे उपस्थित असलेले लोक विरल भयानी आणि मानव मंगलानी या पापाराझी टीमचे नाव घेऊ लागले. यावर जया रागाने विचारते, हे वृत्तपत्र कोणाचे आहे? (Jaya Bachchan Gets Angry Video Troll on social media nmp)


नात नव्या नवेली परेशान


आजी जया बच्चन यांचा या वागणुकीनंतर नात नव्या नवेदी नंदा हैराण झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नव्या आपल्या आजीला शांत राहण्याचा सल्ला देते आहे. 



'व्हॉट द हेल नव्या'


जया बच्चन आणि नव्या नवेली सध्या 'व्हॉट द हेल नव्या' या पॉडकास्टमध्ये तिची मुलगी श्वेता बच्चनसोबत दिसत आहे. अलीकडेच नव्या नंदाने तिच्या इंस्टाग्रामवर तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन यांचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिन्ही महिला कॅमेरासमोर पोज देताना दिसल्या. जया बच्चन लवकरच करण जोहरच्या रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेमध्ये दिसणार आहे. वर्क फ्रंटवर या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत.