मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. जया बच्चन या नेहमीत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बऱ्याचवेळा त्या पापाराझींवर चिडताना दिसतात. त्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे बऱ्याचवेळा त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. जया बच्चन यांना फोटो आणि सेल्फी शेअर काढलं आवडत नाही. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक मुलगी जया बच्चन यांची मिमिक्री (Mimicry)  करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जया बच्चन यांच्या मिमिक्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत डिजिटल क्रिएटर एनाली सेरेजोने दिसत आहे. तिनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. जया बच्चन पापाराझींशी कसं बोलतात ते एनालीनं दाखवलं आहे. एनालीनं जया बच्चन यांची हुबेहूब नक्कल केली आहे. एनालीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटही केल्या आहेत.


एनालीच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, अगदी हुबेहुब मिमिक्री केलीस. दुसरा नेटकरी म्हणाला, मी पोट धरून हसतोय. तिसरा नेटकरी म्हणाला, हा व्हिडीओ ओरिजिनलपेक्षाही खूप चांगला आहे. अशा अनेक कमेंट करत एनालीच्या मिमिक्रीची नेटकऱ्यांनी स्तुती केली आहे. दरम्यान, एनालीनं हा व्हिडीओ 19 ऑक्टोबर रोजी शेअर केला होता. एनालीचज्या या व्हायरल व्हिडीओला अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, जया बच्चन यांचा स्वभाव असा का आहे? त्या इतक्या का रागवतात? तसेच त्या चाहत्यांना का फटकारतात? असे अनेक प्रश्न अनेकदा उपस्थित होतात. यावर काही वर्षांपूर्वी त्यांची मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी भाष्य केले होते. त्यानंतर आता जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2014 दरम्यान दिलेल्या मुलाखतीतील आहे. (Jaya bachchan hilarious mimicry video by girl went viral) 


2014 मध्ये जया बच्चन यांनी गुफ्तगू या एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत जया बच्चन यांना त्यांच्या स्वभावाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तुम्हाला अनेकदा चिडचिड स्वभावाच्या किंवा सतत रागावणाऱ्या स्वभावासाठी ओळखले जाते. याचे नक्की कारण काय? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाला, “मी यावर काय उत्तर देऊ. मला मूर्खपणा अजिबात सहन होत नाही. जर तुम्ही मला अशी काही गोष्ट सांगितली ज्यातून मी काही तरी बोध घेऊ शकेन किंवा त्यातून माझ्या ज्ञानात भर पडेल तर मी चिडचिड करणाऱ्या स्वभावाची आहे, असे तुम्हाला कधीच वाटणार नाही. हो मला पटकन राग येतो. पण याचा अर्थ मी सतत चिडचिड करते असा होत नाही. लोकांनी माझा वेळ वाया घालवला की मला राग येतो. मी त्यांचा मूर्खपणा सहन करू शकत नाही.”