मुंबई : बच्चन कुटुंबाशी संबंधित किस्से ऐकण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे, जी सिमी ग्रेवालने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिमी ग्रेवाल ही तिच्या काळातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी टीव्ही अँकर आहे, सिमी ग्रेवालने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या सेलिब्रिटीची मुलाखत घेतली आहे.


ही क्लीप मुलाखतीच्या आधी घडलेल्या काही गोष्टींची आहे. रेखापासून प्रियंका चोप्रा, सैफ आणि अमृता ते अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यही सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये दिसले आहेत.


सिमी ग्रेवालने अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाचा एक मजेदार न पाहिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या सतत काही ना काही शेअर करताना दिसतात.


व्हिडिओमध्ये, सिमी तिच्या शोमध्ये हजेरी लावल्याबद्दल बच्चन कुटुंबाचे आभार मानते. त्यावर अमिताभ बच्चन यांनी मजेशीर उत्तर दिले होते, "जेव्हा तुम्हाला शो सोडावेसे वाटेल, तेव्हा मी या शोची जबाबदारी घेईन. मी टेलिव्हिजनमध्ये देखील दीड वर्ष काम केले आहे, मला फक्त पांढरे कपडे घालावे लागतील."


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यावर जया बच्चन यांनी पती अमिताभ बच्चन यांच्या दाढीवरुन एक प्रश्न उपस्थित केला. ज्यामुळे शोच्या सेटवरचं सगळं वातावरणचं बदललं.


जया बच्चन यांनी अमिताभ यांना विचारलं की मग तुम्ही जर हा शो सांभाळणार असाल, तर दाढीचं काय होणार... त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले, दाढी तर आधीच सफेद आहे...हे ऐकताच सेटवर सगळे हसू लागले.