Jaya Bachchan on Amitabh Bachchan Not Being Romantic :  बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांची जया बच्चन या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्या दोघांच्या नात्याविषयी नेहमची चर्चा होत असल्याचं आपण पाहिलं आहे. दरम्यान, तुम्हाला माहितीये का कधी जया बच्चन यांनी अमिताभ हे त्यांच्यासोबत रोमॅन्टिक नाही असं म्हणाल्या होत्या. नक्की काय म्हणाल्या होत्या हे जाणून घेण्याची सगळ्यांना इच्छा आहे. त्याविषयी जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाला इतकी वर्ष झाली असली तरी त्यांच्यातील प्रेम हे काही कमी झालेलं नाही. एका जुन्या मुलाखतीत जया बच्चन यांनी त्यांचा नवरा अमिताभ बच्चनसोबत असलेल्या त्यांच्या नात्यावर वक्तव्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी रोमॅन्टिक रिलेशनशिप आणि बॉन्डिंगविषयी खुलासा केला होता. 


खरंतर 1998 मध्ये सिमी ग्रेवाल यांनी एका मुलाखती दरम्यान, अमिताभ बच्चन यांना विचारलं की 'काय त्या स्वत: ला रोमॅन्टिक समजतात का?' त्यावर उत्तर देत अमिताभ यांनी सांगितलं की 'नाही'. अमिताभ यांच्या उत्तरावर जया बच्चन यांना हसू अनावर झालं. जया हसत म्हणाल्या की 'माझ्यासोबत तर रोमॅन्टिक नाही.' 


त्यानंतप पुढे सिमी ग्रेवाल यांनी पुन्हा एकदा अमिताभ यांना विचारलं की 'त्यांच्या हिशोबानं रोमॅन्टिक असणं याचा अर्थ काय आहे? पण अमिताभ हे काही बोलण्याआधी त्यांची पत्नी जया यांनी उत्तर देत सांगितलं की रोमॅन्टिक होण्याचा अर्थ पार्टनरसाठी वाईन घेऊन येणं, त्यांना फूल देणं. पण जया यांच्या या वक्तव्यावर अमिताभ यांनी लगेच उत्तर दिलं की मी तर हे सगळं कधीच केलं नाही. त्यावर जया यांनी मस्करी करत अंदाज लावला की जर अमिताभ बच्चन यांची गर्लफ्रेंड असती तर शक्यता आहे की त्यांनी हे सगळं केलं असतं.' 


हेही वाचा : 'मी जिवंत आहे'; मृत्यूच्या अफवांवर श्रेयस तळपदेनंच शेअर केली पोस्ट! म्हणाला...


सिमी ग्रेवाल यांनी पुढे जया यांना विचारलं की 'डेटिंगच्या वेळी अमिताभ हे त्यांच्यासोबत रोमॅन्टिक झाले होते का?' त्यावर जया यांनी उत्तर दिलं की 'आम्ही याविषयी कधी चर्चा केली नाही. जया यांनी पुढे सांगितलं की अमिताभ हे एकमेव व्यक्ती होते जे त्यांना इन्फ्लुएन्स करु शकत होते. तसं कोणी करु शकलं नसतं. त्यामुळे त्यांना त्या खूप घाबरतात.' जया यांनी अमिताभ यांच्याविषीय सांगितलं की 'जर ते नॉर्मली काही बोलतात तरी मी ते करते. मला त्यांना आनंदी ठेवायचं असतं.'