मुंबई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधरलेला सिनेमा 'थलायवी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जयललिता यांनी 104 पेक्षा जास्त तामिळ, तेलुगू  आणि कन्नड सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय त्यांनी बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून देखील काम केलं आहे. पण या सिनेमांमध्ये त्यांची भुमिका फार छोटी होती. त्यांनी बॉलिवूडमध्ये देखील नशिब  आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यांना फक्त एका हिंदी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयललिता यांनी बॉलिवूडमध्ये अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत काम केलं होतं. सिनेमाचं नाव होतं 'इज्जत'. को.टी.प्रकाश राय दिग्दर्शित हा सिनेमा 1968 रोजी प्रदर्शित झाला . धर्मेंद्र आणि जयललिता यांच्यासोबत सिनेमात तनुजा यांनी देखील मुख्य भुमिका साकारली होती. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला.



सिनेमातील  'रुक जा जरा किधर को चला' गाण्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं  होतं. हे गाणं धर्मेंद्र-जयललिता यांच्यावर चित्रीक करण्यात आलं होतं.  सिनेमात जयललिता यांनी एका आदिवासी मुलीची भुमिका  साकारली होती. 


दरम्यान, आज सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाचं प्रतिसाद मिळाला. या सिनेमाच्या माध्यमातून त्यांचा अभिनयापासून ते राजकाणापर्यंत प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  'थलायवी' चित्रपट 23 एप्रिला रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.