मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक अभिनेत्रींच्या प्रेग्नेन्सीची चर्चा रंगली आहे. त्यात एका प्रसिद्घ गायिकेने लग्न केल्याची घटना घडली. मात्र या तिच्या लग्नापेक्षा तिच्या एंगेजमेंटची चर्चा रंगली आहे. तुम्हाला असं वाटलं असेल की एगेजमेंट रिंगमध्ये असं काय आहे? तर या रिंगमध्येच खुप काही आहे. कारण या एगेजमेंट रिंगची किंमत एकूण तुम्हाला धक्का बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉलिवूड कपलं जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि बेन ऍफ्लेक (Ben Affleck) दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. बेन आणि जेनिफरच्या या लग्नात या जोडप्याची पाच मुलं मॅक्स, एमी, व्हायोलेट, सरफिनिया आणि सॅम्युअल देखील उपस्थित होते. तसेच दोघांच्या लग्नाच्या या सेलिब्रेशनमध्ये अनेक हॉलिवूड स्टार्स उपस्थित होते.बेन आणि जेनिफरच्या दुसऱ्या लग्नाचे खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


एंगेजमेंट रिंगची किंमत किती?
एप्रिलमध्ये जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांची एंगेजमेंट झाली होती आणि त्यावेळी जेनिफर लोपेझची अंगठी चर्चेत आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफरच्या अंगठीची किंमत सुमारे 5 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 37 कोटी रुपये होती. त्याचवेळी, काही रिपोर्ट्समध्ये असे देखील बोलले जात आहे की, या अंगठीची किंमत 10 मिलियन पेक्षा जास्त म्हणजे सुमारे 76 कोटी रुपये आहे. 


दरम्यान दोघांनी आता लग्न केले. जेनिफर आणि बेन यांनी एका निवेदन जारी करत त्यांच्या लग्नाची घोषणा केली. त्यात जेनिफरने लिहिले की, "प्रेम सुंदर आहे, प्रेम दयाळू आहे. म्हणूनच प्रेम देखील सहनशील आहे. 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता एकत्र आलो आहोत, असे तिने म्हटले आहे.